Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीभाविकांकडून मार्कांडेश्र्वराच्या चरणी लाखोंचे दान,
spot_img

भाविकांकडून मार्कांडेश्र्वराच्या चरणी लाखोंचे दान,


चामोर्शी:- विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कडा देव येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरत असते यावर्षी यात्रा ०८ मार्च पासून सुरू झाली त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक गुप्तदान, हुंडीत, व दांनपेट्यात दान टाकत असतात १४ मार्च रोजी दांनपेट्या उघडण्यात आले असता यावर्षी मार्कडेश्र्वराच्या चरणी.भाविकांनी०३ लाख …४७. हजार .५०रुपयाचे दान पेटीत व हुंडित गुप्त जमा केले . तर मागील वर्षी ०३ लाख ०६ हजार ३४६ रुपयाचे दान प्राप्त झाले होते.
महाशिवरात्री निमित्त ०८ मार्च पासून मार्कडेश्र्वराच्या यात्रेला सुरुवात झाली त्यादिवशी महापूजा, त्रिपुर पूजा,व समारोपीय व पालखी आदी विविध कार्यक्रम झाल्यानंनतर १४ मार्च रोजी गुप्त दानाची मोजणी देवस्थान कार्यालयात करण्यात आली. त्यात दानपेटीत व हुंडीत .०३ . लाख .४७ हजार ५० रुपयाचे दान प्राप्त झाले गुप्तदान मोजणी दुपारी बारा वाजता सुरू करण्यात आली ते काम दिवस भर चालले त्यावेळी . देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तीवाडे, माजी सरपंच मुखरू शेंडे,जयराम चलाख, मनोज हेजीब, रामेश्वर गायकवाड, उज्ज्वल गायकवाड, नवनाथ सांतपैसे, माधव महाराज जुंनघरे, तहसीलदार यांचे शासकीय प्रतिनिधी नायब तहसीलदार सुखदेव कावळे, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी पंचायत विस्तार अधिकारी एम.के काळबांधे , पोहवा एकनाथ वणवे, गृहरक्षक दलाचे सुभाष सूरजागडे, जलिंदर जवादे, चंद्रशेखर पाल, मनोहर कराडे, ट्रस्टचे कर्मचारी,व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page