Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीहजारो भाविकांनी घेतले मार्कंडेश्र्वराच्या पालखीचे दर्शन
spot_img

हजारो भाविकांनी घेतले मार्कंडेश्र्वराच्या पालखीचे दर्शन


चामोर्शी:- तालुक्यातील पवित्र तीर्थस्थळ मार्कडा देव येथे सुरू असलेल्या मार्कंडेश्र्वर यात्रे दरम्यान ११ मार्च रोजी समारोपीय महापूजा तर १२ मार्च रोजी मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली त्यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
११ मार्च रोजी मार्कडेश्वर मंदिरात शिवलिंगाची समारोपीय महापूजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तालुका खरेदी विकी संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट को. आप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई शिखर संसथेचे संचालक अतुल गण्यारपवार व त्यांच्या अर्धंगिनी सौ. साधना गण्यारपवार , अजिंक्य अतुल गण्यारपवार व नितीन पोषट्टीवार व माधुरी नितीन पोषट्टीवार यांनी सपत्नीक यांचे हस्ते करण्यात आल्यानंतर मार्कडेश्र्वराची शोभायात्रा व पालखीची पूजा अर्चा करून दुपारी २.३० वाजता वाजता वाजत गाजत, , ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाध्यासह गौरीपुर येथील भजन मंडळ मतवा महासंघ ७६, गडचिरोली श्री साई बँड पार्टी यांच्या गजरात पालखी मार्कंडेश्वर देवस्थान परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर पालखी संपूर्ण यात्रेतून फिरवून पालखीचा समारोप मार्कडेश्वर देवस्थान ट्रस्ट येथेच करण्यात आला. त्रिपुर लावल्यानंतर मार्कडेश्वराची निघणारी पालखी महत्वाची मानली जाते. जे भाविक त्रिपुरच्या दिवशी उपस्थित राहू शकले नाही ते भाविक मार्कंडेश्वराच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात यात्रेचा आजचा पाचवा दिवस असून पुनः पाच दिवस यात्रा राहू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे अद्यापही विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. यात्रेतील उत्साह अद्यापही कायम आहे मनोरंजनाची साधने यात्रेत आली असल्याने भाविकांची गर्दी रात्री १० पर्यंत दिसून येते आज काढण्यात आलेल्या पालखी शोभायात्रेत मार्कडेश्र्वर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामुजी पा. तीवाडे, बालस्वामी पिपरे महाराज, जयराम चलाख , गोपाल मेनेवार, अरुण गायकवाड, उमाकांत जुंनघरे , पुरातत्व विभागाचे हरिहर कुंभारे , , गोविदा महाराज वासेकर , , पुजारी रामू महाराज गायकवाड, पंकज पांडे, श्रीकांत पांडे , मनोज हेजिब, आदी उपस्थित होते.पालखी दरम्यान भाविकांनी मोठी गर्दी केली होती . पोलिसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page