Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीवेलतुर तुकूम घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक-------------------- प्रमोद भगत यांची जिल्हाधिकाऱ्याकडे...
spot_img

वेलतुर तुकूम घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक——————– प्रमोद भगत यांची जिल्हाधिकाऱ्याकडे कारवाई करण्याची मागणी.

चामोर्शी :- तालुक्यात मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक चालू असल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये वृत्त सुद्धा प्रसारित झाले होते. परंतु महसूल प्रशासनाने याच्यावर आळा न घातल्याने अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अखेर चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी दिनांक 12 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देऊन वेलतुर तुकूम व वेलतूर रिट या दोन्ही नदी घाटातून मोठ्या प्रमाणात उपसा करून अवैध रित्या सर्रासपणे रेती वाहतूक केली जात आहे. रात्रभर मोठ्या प्रमाणात रेती भरलेल्या ट्रॅक्टर जातात त्यामुळे संपूर्ण रस्ते व रोड उखडून खराब झाले असल्याने त्यामुळे शाळेत जाणारे मुले व गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे व रात्री ट्रॅक्टरच्या आवाजामुळे मुलांना अभ्यास करण्याचा त्रास होतो त्यातल्या त्यात 10 वी12 परीक्षा पण चालू असल्याने मुलांच्या अभ्यासावर या आवाजाचा परिणाम होऊ शकतो. सदर वाहन धारक कुणालाही न घाबरता व प्रशासनाची भीती न बाळगता सर्रास पणे अवैध वाळू वाहतूक करीत आहे. त्याकरिता सदर वाहनावर कार्यवाही करून अवैध वाळू बंद करण्यात यावी. अशी मागणी चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी निवेदनाद्वारे केले आहे.आता जिल्हाधिकारी कारवाई करतात का याकडे लागले सर्वांचे लक्ष.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page