Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीमहीला सक्षमीकरण काळाची गरज
spot_img

महीला सक्षमीकरण काळाची गरज

चामोर्शी :- स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. डी .जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील महीला मार्गदर्शन समितीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
“महिला सक्षमीकरण व
आत्मसंरक्षन” या संकल्पनेवर आधारित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजेंद्र झाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रेरणा मोडक, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, प्रा.डॉ. किरण बोरकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली, महाविद्यालयातील महिला मार्गदर्शन समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली कावळे उपस्थित होत्या.अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्रा.डॉ. राजेंद्र झाडे यांनी महीला या नेहमीच्या जीवनात विविध भूमिका पार पाडत असतात, “मुलगी शिकली प्रगती झाली” या उक्तीप्रमाणे देशाची प्रगती व्हायची असेल तर मुली शिकल्या पाहिजे सोबतच त्यांना असलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतः सोबतच देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.प्रेरणा मोडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धाडसाने समोर येऊन उद्भवलेल्या परिस्थितीवर मात केली पाहिजे.जीवन जगत असताना समस्या निर्माण होतात त्या दूर करत त्यावर मात करीत धैर्याने समोर गेले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.किरण बोरकर यांनी जागतिक महिला दिनाविषयी माहिती विद्यार्थिनींना दिली. मार्गदर्शन करतांना महिला सक्षमीकरणाची नितांत गरज आहे ज्यामुळे आजची स्त्री ही राष्ट्र निर्मातीसाठी खऱ्या अर्थाने सक्षम होईल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैशाली कावळे ,संचालन कु. श्रुती वैरागडे , तर आभार कु. आस्था हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ.आर.डी.बावणे,डॉ.भूषण आंबेकर, प्रा.दीपक बाबनवाडे,प्रा. प्रा.वंदना थुटे, प्रा. डिंपल झाडे, प्रा.जयश्री बोबाटे, प्रा.शुभांगी खोबे, प्रा. स्नेहा उसेंडी, डॉ. प्रसेन ताकसांडे, प्रा. अरुण कोडापे, प्रा.रोशन गेडाम, प्रा.वैभव म्हस्के, प्रा. संकेत राऊत तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page