Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरजागतीक महिला दिन आपल्या शक्तीचे स्मरण करण्याचा दिवस! - पालकमंत्री ना. सुधीर...
spot_img

जागतीक महिला दिन आपल्या शक्तीचे स्मरण करण्याचा दिवस! – पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

राजुऱ्यात पहिल्यांदाच हजारो महिलांच्या उपस्थितीत भव्य सांस्कृतिक महोत्सव

राजुरा :- स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय राजुराच्या वतीने राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे व्दारा आयोजित सांस्कृतिक व महिला क्रिडा महोत्सवाचे आयोजन (दि. १२) करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्यव्यवयाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, जागतिक महिला दिन हा एका दिवसापुरता मर्यादित नाही तर त्या दिवशी महिलांनी आपल्या शक्तीचे स्मरण करण्याचा दिवस आहे. स्त्री मध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती आहे परंतु अनेकदा त्यांची कस्तुरी मृगासारखी अवस्था असते. कस्तुरी मृगाच्या बेंबीतच सुगंध असतो, सुगंधरुपी कस्तुरी आयुष्यभर धावत राहते. या कस्तुरी प्रमाणे महिलांच्या अंगी असलेल्या कला गुणांचा परीचय व्हावा म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय राजुराच्या वतीने देवराव भोंगळे यांनी नगर परिषद तलाव समोरील जागेत जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक व महिला क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले. यात महिलांसाठी निंबू चम्मच, बोरा रेस, रस्सी खेच, संगीत खुर्ची सारख्या विविध स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांकरीता एकल नृत्य, समुह नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये ५५ समुह नृत्य तर १० एकल नृत्यासाठी महिला स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलांना जागतीक महिला दिनाची स्नेहभेट म्हणून भेट वस्तू ही देण्यात येणार आहे.

सेवा केंद्रातर्फे यापुर्वी सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेश उत्सव, शारदादेवी, दुर्गादेवी उत्सवात सजावट स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचे बक्षिस वितरण व मान्यवारांचा सत्कार याप्रसंगी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी काही युवा कार्यकर्त्यांनी ही भाजपात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून ना. मुनगंटीवार यांनी भाजप परीवारात स्वागत केले.

राजुरा शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याने महिलांनी मोठ्या उत्साहाने हजारोच्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. या सांस्कृतिक कार्यक्रमात युवा महिलांसह वयोवृध्द महिलांनी सुद्धा सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन उज्वला जयपूरकर, प्रिती रेकलवार तर प्रास्ताविक शुभांगी रागीट यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अर्चना भोंगळे, शितल वाटेकर, ममता केशट्टीवार, राणी नळे, सिमा देशकर, रजनी बोढे, स्वरूपा झंवर, योगीता भोयर, सुनैना तांबेकर, लक्ष्मी बिस्वास, दिपा बोंथला, पुजा गुंटी आदिंनी परीश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page