Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरआ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५ कोटींच्या पांदन रस्त्यांचे भुमिपुजन
spot_img

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५ कोटींच्या पांदन रस्त्यांचे भुमिपुजन

राजुरा (ता.प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यातील विविध गावात मंजूर ५ कोटी रुपये निधीच्या पांदन रस्त्यांच्या विकासकामांचे भुमिपुजन त्यांच्याच हस्ते पार पडले. पंचायत समिती राजुरा येथे बळीराजा ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्त्यांच्या या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यामध्ये राजुरा तालुक्यातील मौजा वरूर रोड, सुमठाना येथील सुमठाना, भेंडाळा, नवेगाव, चनाखा, चिंचोली बु., देवाडा, धानोरा, कोष्ठाळा, मुर्ती, पंचाळा, सातरी, सिर्सी, विहीरगाव, येरगव्हाण येथील ग्रामपंचायत अंतर्गत पांदन रस्त्यांच्या विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, महिला काँ. तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, माजी सभापती मंगेश गुरूनुले, समाजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, आनंद दासरी, दिनकर कर्नेवार, रामदास पुसाम, धनराज चिंचोलकर, अशोक राव विहीरगाव चे सरपंच निलकंठ खेडेकर, चनाखा चे सरपंच रेखा आकनुरवार, भेंडाळा चे सरपंच शंकर आत्राम, चिंचोली बु. चे सरपंच पिलाजी भोंगळे, देवाडा चे सरपंच शंकर मडावी, धानोरा चे उपसरपंच घनश्याम दोरखंडे, कोष्ठाळा चे सरपंच लक्ष्मी पोशट्टी, मुर्ती चे धनराज रामटेके, पंचाळा चे सरपंच शोभा मडावी, सातरी चे सरपंच पदमा वाघमारे, शीर्शी चे सरपंच मंदा किन्नाके, सुमठाना चे सरपंच भाष्कर देवतळे, वरूर रोड चे सरपंच गणपत पंधरे, येरगव्हाण चे सरपंच काजल गेडाम यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page