Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीआजी - माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा आरसा-- बानबले
spot_img

आजी – माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा आरसा– बानबले

चामोर्शी :- आजी – माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा आरसा असतात, असे प्रतिपादन श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गोविंदरावजी बानबले यांनी केले.
चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी, पालक व शिक्षक मेळाव्यात ते अध्याक्ष स्थानावरून बोलत होते. विद्यार्थ्यांनी चांगले काम स्वीकारून स्वतःला कार्यरत ठेवावे, आणि महाविद्यालयाचे नाव लौकीक करावे असेही ते म्हणाले.
या माजी विद्यार्थी, पालक व शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन कु.क्षितिजा मानापुरे या माजी विद्यार्थीनी यांनी केले, आणि आपल्या उद्घटनीय भाषणात बोलताना त्या म्हटल्या की महाविद्यालयामधूनच विद्यार्थ्यांची खरी प्रतिभा विकसित होत असते.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदस्य डी.एन.चापले, अरूण पाटील मुनघाटे, शरद पाटील ब्राम्हणवाडे,सेवानिवृत्त प्राध्यापक संजय म्हस्के, सौ.आशाताई कडस्कर,मधुकरराव गुडेंकवार, तुषार कर्णे,शेषराव कोहळे, अमर चलाख, कु.राधिका जुवारे तसेच या मेळाव्याचे आयोजक महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ.डी.जी. म्हाशाखेत्री उपस्थित होते. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याचे संचालन प्रा. वंदना थुटे, प्रास्ताविक प्रा.डॉ.राजेंद्र झाडे, तर आभार प्रा. वैशाली कावळे यांनी मानले. यशस्वीेसाठी प्रा.डॉ.आर.डी.बावणे, डॉ.भूषण आंबेकर,प्रा.दीपक बाबनवाडे,, प्रा.डॉ.प्रासेन ताकसांडे, प्रा.अरुण कोडापे,प्रा. रोशन गेडाम, प्रा.वैभव म्हस्के,प्रा.संकेत राऊत, प्रा. डिंपल झाडे, प्रा.शुभांगी खोबे, प्रा.जयश्री बोबाटे, प्रा. स्नेहा उसेंडी व शिक्षकेत्तर कर्मचारी लोमेश दरडे, रवी कऱ्हाडे, चंद्रपाल राठोड, विक्की बरसागडे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page