Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरश्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे महाशिवरात्री उत्सवाचे थाटात उद्घाटन.
spot_img

श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे महाशिवरात्री उत्सवाचे थाटात उद्घाटन.

मंदिराचे ट्रस्टी तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

राजुरा प्रतिनिधी:-

राजुरा शहरातील प्राचीन श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान येथे दि. 8 मार्च ला महाशिवरात्री निमित्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य महिला व पुरुष भजन मंडळाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वच्छतेचे पुजारी गाडगे महाराज व श्री शंकर भगवान यांच्या प्रतिमांचे व शिवलिंगाचे पूजन करून फीत कापून उद्घाटन केले. यावेळी श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान देखरेख समितीचे मारोतराव येरणे, प्रकाश बेजंकिवार,भाऊराव बोबडे, प्रशांत गुंडावार,प्रल्हाद मोहूर्ले, केशवराव डाहुले,नामदेव चन्ने, लक्ष्मण पवनकर,भाऊराव खाडे, रामचंद्र आदे, बापूजी कुचनकर,यशवंत पवार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, संदीप आदे, सुनैना तांबेकर, रवी बुटले, अल्का गंगशेट्टीवार, सचिन मोरे, उमेश लढी, श्रीरंग ढोबळे, भास्कर करमरकर ,सचिन मोरे, सोमेश्वर युवक सेवा मंडळ राजुराचे पदाधिकारी, सदस्य आदींची उपस्थिती होती. १९५४ सालापासून या मंदिराचा ट्रस्ट आहे. हैद्राबाद सरकारने हा ट्रस्ट स्थापन केला होता आणि राजुर्याचे तहसीलदार हे या ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त होते. राजुरा महाराष्ट्रत आल्यानंतर १९६८ मध्ये पुन्हा या मंदिराची धार्मिकन्यास म्हणून नोंदणी करण्यात आली. अतिशय प्राचीन व जागृत अश्या श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्य विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दि.९ मार्च ला सायंकाळी साडेसात वाजता ह.भ.प.गुणवंतदादा भद्रावतीकर महाराज यांचे समाज प्रबोधनावर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सोमेश्वर युवक सेवा मंडळ, श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान देखरेख समिती ,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समितीचे पदाधिकारी, सदस्य अथक परिश्रम घेत आहे. याठिकाणी भक्तभाविकाना प्रसाद वितरण करिता दानशूर मान्यवरांनी सहकार्य केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page