Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीमार्कडेश्र्वराची प्रारंभी महापूजेचा मान संत मूर्लीधर महाराज व खासदार ,आमदार यांना
spot_img

मार्कडेश्र्वराची प्रारंभी महापूजेचा मान संत मूर्लीधर महाराज व खासदार ,आमदार यांना


लाखो भाविकांनी घेतले दर्शन. चामोर्शी : – विदर्भाची कांशी श्री श्रेत्र मार्कंडादेव महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रारंभी महापुजा श्री शंकर भगवानाच्या शिवालिगांच्या पुजेचा मान हरणघाट चे संत मुरलीधर महाराज व लोकसभेचे खासदार अशोक नेते पत्नी अर्चना नेते , आणि आमदार डॉ . देवराव होळी पत्नी बिनाराणी होळी यांचे हस्ते तर महापुजेचे यजमान पंकज पांडे , शुभांगी पांडे, व प्रफुल भांडेकर , वैशाली भांडेकर हे ही पूजेचे यजमान होते . यावेळी पूजेला बाबुराव कोहळे सपत्नीक तर श्रीकांत पांडे व मनोज हेबिज उपस्थित होते .यावेळी पुजारी नाना महाराज आमगावकर यांनी मंत्रो उच्चारत महापूजा सांगितली
यावेळी महापूजेला उपविभागिय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार प्रशांत घोरूडे, गट विकास अधिकारीसागर पाटील, वनपरीक्षेत्रधिकारी आर.बी.इंनवते देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, , सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी पाटील तिवाडे, रामप्रसाद महाराज मराठा धर्म शाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडूकवार , सचिव अशोक तिवारी , संजय वडेट्टिवार , नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , अमोल आइंचवार नगरसेविका प्रेमा आईंचवार पंकज वायलालवार, महीला बाल कल्याण सभापती स्नेहा सातपुते, नगरसेविका वर्षा भिवापुरे , गीता सोरते, दिलीप चलाख , अमोल गण्यारपवार, पंचायत विस्तार अधिकारी एम.के.काळबांधे, अन्य वारकरी भाविक भक्त उपस्थित होते .
बॉक्स;- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचसह नगरसेवक लौकिक भिवापूरे यांनीही मार्कडे श्वराचे दर्शन घेत पूजा अर्चा केली.

या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व असल्याने भक्तगण भल्या पहाटेपासूनच रांगेत दर्शनासाठी उभे होते यासाठी भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्कंडेश्वर देवस्थानच्या वतीने बॅरिकेटिंग पासून स्तनदा माता, अपंग, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती यासाठी चांगली सोय केल्याने दर्शनासाठी कोणतीही तारांबळ उडाली नाही. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त व सुरक्षा दिसून आली. महापूजेनंतर सुद्धा भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि साधारणता तीन दिवस भाविकांची प्रंचड गर्दी दिसून आली . दिवसभरात लाखोंच्या संख्येने श्री मार्कंडेश्वराच्या शिवलिगांचे दर्शन घेतले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page