Tuesday, April 16, 2024
HomeUncategorizedराज्य अधिवेशनाला शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन : मराशिप
spot_img

राज्य अधिवेशनाला शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन : मराशिप


चामोर्शी :-
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशन यावेळी राज्यातील नागपूर येथील वसंतराव देशपांडे, स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे दिनांक १७ व १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष वेणूनाथ कडू राज्य अध्यक्ष म. रा. शि. प. हे असून प्रमुख उदघाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , स्वागताध्यक्ष म्हणून संदीप जोशी, उपमुख्यमंत्री मानद सचिव महाराष्ट्र राज्य, डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्र-कुलगुरू, महेंद्र कपूर, माजी आमदार अनिल सोले पदवीधर मतदार संघ नागपूर विभाग, माजी शिक्षक आमदार नागो गाणार
माजी आमदार भगवान साळुंखे, राजकुमार बोनकीले राज्य सरकार्यवाह म. रा. शि. प. हे यावेळी उपस्थित राहणार असून १७ व १८ फेब्रुवारीला देशातील शिक्षणक्षेत्रातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, व जुनी पेन्शन योजना याविषयी उपस्थित मान्यवरांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच या अधिवेशनात यावेळी शिक्षकांच्या असणाऱ्या समस्याचे तक्रार निवारण व शंकाचे समाधान यावेळी चर्चा करून करण्यात येणार आहे तरी वरील त्रैवार्षिक राज्य अधिवेशनात अनेक शैक्षणिक विषयावर चर्चा होणार असून या अधिवेशनास शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार , जिल्हा अध्यक्ष अनिल नूतीलकंठावार, जिल्हा कार्यवाह सागर आडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बोमनवार, जिल्हा सहकार्यवाह जि.एच.रहेजा , देविदास नाकाडे , कोषाध्यक्ष जीवन उईके , संघटनमंत्री विश्वजित लोणारे ,गणेश तगरे,सह संघटनमंत्री शिवदास वाढणकर , संजय नागापुरे , महिला आघाडी प्रमुख मृणाल तुम्पल्लीवार , सह महिला आघाडी प्रमुख जयश्री लोखंडे शिक्षक संदेश प्रमुख घनश्याम मनबतुलवार खाजगी प्राथमिक विभाग जिल्हा अध्यक्ष संतोष जोशी , जिल्हा कार्यवाह इम्रान ही. पठाण ,जिल्हा उपाध्यक्ष जानकिराम नन्नावरे ,संघटनमंत्री दिलीप तायडे
यांच्या सह सर्व पदाधिकारी यांनी केल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत बुरांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page