Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीट्रकची दुचाकीस्वारास धडक-- एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी
spot_img

ट्रकची दुचाकीस्वारास धडक– एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी

चामोर्शी:- पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनापूर फाट्याजवळ जवळ ट्रेलरने दुचाकी स्वारास जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता च्या सुमारास घडली. यामध्ये सुरेश महादेव दूधबावरे वय ५५ असे मृतकाचे नाव असून व किरकोळ जखमी झालेल्या युवक लूकेश दूधबावरे वय 35 राहणार सोनापूर. सायंकाळच्या सुमारास सोनापूर ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी सुरेश दूधबावरे हे मिस्त्रीचे काम आटपून गावातील लूकेश दुधबावरे यांच्यासह चामोर्शी वरून सोनापूर कडे दुचाकीने MH 33Z6877 परत जात होते . मुख्यमार्गावरून गावाकडे वळण घेत असताना आष्टीकडे जाणाऱ्या मागुन येत असलेल्या सीजी 07 बीजी 5597 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रेलरने दुचाकी स्वरास जबर धडक दिली. यात लुकेश दुधबावरे दूर फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झाले. तर सुरेश दूधबावरे वाहनाच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने जागीच गतप्राण झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूने सोनापूर गावात शोक कडा पसरली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लूरकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.यावेळी कुटुंबियासह ग्रामस्थांचा रस्त्यावरच संताप सोनापूर गावाजवळ सुरेश दुधावरे हे ट्रेलरच्या खाली चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाले. यामुळे वृत्तकाच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र संता व्यक्त करीत रस्त्यावर ठिया घातला होता. यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठीत वेळीच ग्रामस्थांना शांत केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page