Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूर२०२३ मधील अतिवृष्टी व पुरपरसस्थितीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याप्रमाणे मोबदला द्या--राजुरा तालुका युवक...
spot_img

२०२३ मधील अतिवृष्टी व पुरपरसस्थितीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याप्रमाणे मोबदला द्या–राजुरा तालुका युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन.

राजुरा (ता. प्र) :– माहे जून, जुलै २०२३ मध्ये अति पावसामुळे, अतिवृष्टी व पुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी लोकांचे खूप नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आपल्या विभागाकडून या नुकसान भरपाईचे पंचनामे झाले होते. पण अजुनही ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून या विषयांचा तातडीने पाठपुरावा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी राजुरा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, संचालक विनोद झाडे, भेंडवी चे सरपंच श्यामराव कोटणाके, उपसरपंच रमेश मडावी, राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईर्षाद शेख यासह नुकसानग्रस्त शेतकरी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page