Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीस्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे यश हेच भावी जीवनाची पूर्वतयारी- नितेश गोहणे
spot_img

स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे यश हेच भावी जीवनाची पूर्वतयारी- नितेश गोहणे

चामोर्शी :- विद्यार्थीदशेत शिक्षण घेत असताना अनेक जण विविध प्रकारच्या शालेय परीक्षा देत असतात त्यात बरेच विद्यार्थी हे स्वयंप्रेरणेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सामान्यज्ञान स्पर्धेत उतरतात आणि यश संपादन करतात . शैक्षणिक जीवनात मिळालेले हे यश म्हणजेच भावी जीवनाची नोकरीसाठी असलेले पूर्वतयारी असल्याचे घोट प्रभारी पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांनी सामूहिक क्रीडा मंडळ , लक्षदीप वाचनालय व गुरुकुल करिअर अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लेखी सामान्यज्ञान स्पर्धेच्या बक्षीस समारोह प्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले . यावेळी स्पंदन फौंडेशन गडचिरोलीचे डॉ . मिलिंद नरोटे , डॉ . एस . सुरपाम , गजानन बारसागडे , जे. एस . चव्हाण , सुनिल बोदलकर , ऋषी वासेकर , प्रमोद मुंगेलवार ,सुनील बुरांडे , बाळाभाऊ दूधबावरे ,मनोज सोनुले , घोती सर , रोशन बारसागडे , आदी उपस्थित होते . यावेळी पाचवी ते सातवी ते दहावी आणि अकरावी ते खुला गट अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली . यात प्राथमिक गटातून प्रथम मंथन वासेकर 3000 रु रोख , द्वितीय आणि तृतीय आदित्य पिपरे 1000 रु रोख बक्षीस देण्यात आले तर माध्यमिक गटातून प्रथम धृप जुवारे इयत्ता 8वी 4000 रु रोख , द्वितीय साहिल रेपाकुलवा 3000 रू रोख तर तृतीय रविना शिंदे 1500 रु रोख आणि खुल्या गटातून प्रथम पायल झुरे 5000 रु रोख , द्वितीय अजय सोमनकर 3000 रू रोख तर तृतीय मंगेश मोहुर्ले 2000 रु रोख आणि प्रोत्साहनपर प्रत्येक गटातून तीन बक्षीस यात अवंत नैताम , बादल सोनुले , अमित मलंगी , आराध्य रबळे , लावण्या नैताम , प्रतिक्षा भुरसे यांना देण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव निकोडे प्रास्ताविक सरिता नैताम आभार तस्वीर अडुलवार यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरज घोती , राज धिरबस्सी , कलीराम घोती , आकाश नरोटे यांनी व सामुहिक क्रीडा मंडळ आणि लक्षदिप वाचनालय अनंतपुर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page