Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीजनतेच्या मनातील लोकनेता हरपला---------------------चामोर्शीतील हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड
spot_img

जनतेच्या मनातील लोकनेता हरपला———————चामोर्शीतील हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड

               स्वप्नील वरघंटे यांचे दुःखद निधन 

 चामोर्शी :-  येथील तेलंग मोहल्यात राहणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य,भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांचे विश्वासू, निष्ठावंत. म्हणून जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर ओळख असलेले व लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर व धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले स्वप्नील श्रीराम वरघंटे यांचे हुदयवीकाराच्या झटक्याने आज पहाटे ( २३ फरवरी)  दुःखद निधन झाले. ते ४० वर्षाचे होते त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली असून निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, स्नेही, भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला, पुरुष, युवकांनी धाव घेतली.

 त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.उद्या २४ फरवरी रोजी सकाळी०९ वाजता मार्कडा येथे वैनगंगा नदी तीरावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनामुळे जनतेच्या मनातील लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच चामोर्शी शहरातील संपूर्ण मार्केट लाईन बंद करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page