Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत विविध विषयावर वादळी चर्चा
spot_img

चामोर्शी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत विविध विषयावर वादळी चर्चा


चामोर्शी:- येथील पंचायत समितीची सन २०२३.२४ या आर्थिक वर्षाची आमसभा २२ फरवरी २०२४ रोजी दुपारी प.स. प्रांगणात आयोजित करण्यात आली. त्या सभेत विविध विषयावर वादळी चर्चा झाली.
सन २०२३.२४ ची वार्षिक आमसभा २२ फरवरी रोजी पंचायत समिती प्रांगणात आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात यावेळी पंचायत समिती , प्र .सहा. गटविकास अधिकारी एम. के.काळबांधे , नगर पंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, जिल्हा सचिव दिलीप चलाख,
जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा ,माजी सभापती भाऊराव डोर्लीकर, जिल्हा युवा मोर्चाउपाध्यक्ष प्रतीक राठी, माजी उपसभापती आकुली बिस्वास, माजी जी.प.सदस्य शिल्पा राय, अनिता राय, माजी प. स सदस्य भाग्यश्री चींतलवार,माजी प. स सदस्य चंद्रकला आत्राम हे उपस्थित होते
त्यावेळी स्थापना विभागाचे अमित दूरबुळे यांनी संविधानाचे वाचन केल्यानंतर सभेला सुरुवात झाली.
सर्वप्रथम पंचायत समितीचे प्रं.सहा.गटविकास अधिकारी एम . के काळबांधे यांनी सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनाविषय विस्तृत माहिती प्रास्ताविक मधून दिल्यानंतर सभाध्यक्षणी मागील आमसभेतील अनुंपालन अहवालास सर्वानुमते मंजुरी दिली
बॉक्स:- या आमसभेत खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले
अनखोडा उपसरपंच वसंत चौधरी यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही
, पी. जे. सातार यांनीघरकुल साठी केलेली तरतुद चालू आर्थिक वर्षात खर्च होईल काय?,
रामचंद्र सातपुते सदस्य नवेगाव रे.यांनी मोदी आवास योजनेला p m आवास योजनेचशी जोडण्यात आले या योजनेनुसार लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत.
योजराज मडावी पेटतळा माजी सरपंच यांनी माझ्या सरपंच पदाचे अद्याप मानधन मिळाले नाही.
सुभाष कोठारे ग्राम पंचायत सदस्य यांनी दोन दोन ग्रामसेवक असून टेंडर परत आले
धानोरकर जयरामपुर यांनी घरकुलाचां निधी देण्यात यावा.
दिलीप चलाख यांनी चीचडोह प्रकल्पत बुडीत शेत्रातील जमिनीचे राजिस्ट्री करण्यात आली नाहीं तर नंदाजी पिपरे व जुवारे, यांचेही जमिनीचे रजिस्ट्री करण्यात आले आले नाही. आणि रक्कम मिळाली नाही. तर बोगस रजिस्टेशन येत असल्याचे लक्षात येते असा ठपका सभाध्याक्षणी ठेवत कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश केले.
रवींद्र कोठारे यांनी ट्रॅक्टर संबंधी पोलिस स्टेशन ला रिपोर्ट दिलेली असता त्याची चौकशी करण्यात आली नाहीं.
सरपंच विनोद मडावी पाणीपुरवठा योजना मागील सहा महिन्यापासून बंद आहे
राहुल पोरटे वाघोली वीज पुरवठा आठ तास असल्याने शेतीला पाणी देऊ शकत नाही.
आदी अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले असता ते प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश सभाध्याक्षानी दिले
या आमसभेचे संचालन संखिकी विस्तार अधिकारी नितीन पेंदोर यांनी तर, आभार विस्तार अधिकारी बोरकुटे यांनी केले याआंमसभेला पंचायत समिती सहा. कक्ष अधिकारी एम एच.शेख, कृषी अधिकारी नगराळे, गटशिक्षणाधिकारी म्हस्के, शाखा अभियंता टेंभुर्ने , यांच्यासह सरपंच , ग्रामसेवक, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्याचे सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page