Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीकंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे सोनापूर-मारोडा ते नवग्राम रस्ता रखडला,--------------------सदर काम त्वरित मार्गी लावा...
spot_img

कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे सोनापूर-मारोडा ते नवग्राम रस्ता रखडला,——————–सदर काम त्वरित मार्गी लावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच शेषराव कोहळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.चामोर्शी, :- ग्रामीण भागात मुख्य रस्त्याला जोडून नागरिकांना ये- -जा करणे सोयीचे व्हावे यासाठी – मुख्यमंत्री ग्रामसडक योजने द्वारा सोनापुर मरोडा ते नवग्राम. रस्ता संबंधित – कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे – मागील पाच वर्षांपासून रखडला असल्याने , ती कामे मार्गी लावावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करावे लागेल अशी मागणी सोनापुर , मारोड, विक्रम्पुर येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यानी २१ फरवरी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली
या पत्रकार परिषदेला. सोणापुरचे उपसरपंच शेषराव कोहळे, विक्रमपुर उपसरपंच प्रभाष सरकार, नवंग्राम ग्राम पंचायत सदस्य दिपक दास, ग्राम पंचायत सदस्य उत्तम कोवे, अनिल उंदीरवाडे, वण समितीचे सचिव पिपलदास सोयाम, मारोडा सदस्य रोशन रोशन कोहळे, व पुरुषोत्तम. बोरकुटे आदी उपस्थित होते त्यावेळी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सन २०१७ – २०१८ पासून सोनापूर, मारोडा, नवग्राम व फोकुर्डी- मुरखळा चक ७.६० की. मी.रस्तयासाठी ४.७३ कोटी मंजूर करण्यात करून सदर काम
पुणे येथील मे इंगवले कंपनी ला देत त्यांना २०१९ मध्ये कार्यरंभ -आदेश दिले. मात्र अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. हा रस्ता सोनापूर, – मारोडा, भोगनबोडी, विष्णुपूर, नवग्राम, – जामगिरी या गावांना राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. तसेच. फोकुर्डी मुरखडा ते मुरखळा चक या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकर्याना व प्रवाशांना, वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवास करताना लहान-मोठ्या अपघाताला समोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार व प्रत्यक्ष भेटून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. परंतु मागील पाच वर्षापासून या रस्त्यांचे कामं कत्राटदाकडून पूर्ण होऊ शकले नाही
.मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११ कामे पुणे येथील एका कंपनीला देण्यात आली होती. मात्र त्या कंपनीने यादीतील ११ कामे मंदगतीने केल्यामुळे करारनाम्यातील अटी, शर्तीनुसार करारनामा रद्द करण्याची शिफारस कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोटकर यांनी नागपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे अधीक्षक अभियंता यांना २१ एप्रिल २०२३ च्या पत्रानुसार केली होती .परंतु संबंधित कंत्राटदाराने हरकत नोंदवून पोलीस विभागाला तक्रार करून बैठक लावली त्यात करारनामा रद्द केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन दबाव तंत्र आण्यांचा प्रयत्न केला मात्र कंत्राटदार काम पूर्ण करण्यासंबंधी कुठलाही ठोस निर्णय न घेता स्वतःही काम करत नसून नव्याने टेंडर करुही देतं नाही . तर कामही सोडत नाही, कत्राटदार गंभीर होताना दिसत नसून वेळकाढू धोरण अवलंबित संबधित विभागाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यात त्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे त्यासाठी
या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता यांना ५ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाला भेटून पत्र व्यवहार करून सुद्धा कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे संबधित कंत्राटदारांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, प्रलंबित अर्धवट कामे तत्काळ o ८ दिवसात सुरू न केल्यास, ग्रामस्थांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सोनापूर, विक्रमपूर, मारोडा, नवग्राम, म येथील सरपंच व पदाधिकारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
:– प्रतिक्रिया –
सोनापुर, मारोडा ते नवंग्राम रस्ता बांधकाम करणाऱ्या कत्राटदाराचा करारनामा रद्द करण्याची प्रक्रिया केली होती मात्र त्या कत्राटदाराने हरकत नोंदवून बैठक घेतली त्या बैठकीत काम करतो, अन्यथा न्यायालयात दाद मागणार म्हणाले तेव्हा त्यांना काम करण्यासाठी काही दिवसाचा वेळ देऊ, त्या कालावधीत काम सुरू न केल्यास पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले
– चंद्रशेखर सालोडकर ( प्रमंग्रासयो) महा. राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्था गडचिरोली

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page