Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीमार्कडेश्र्वर जिर्णोद्धार काम सुरू होई पर्यंत जनआंदोलन, उपोषण सुरूच ठेऊ -संत मूर्लीधर...
spot_img

मार्कडेश्र्वर जिर्णोद्धार काम सुरू होई पर्यंत जनआंदोलन, उपोषण सुरूच ठेऊ -संत मूर्लीधर महाराज यांचा भक्ताच्या बैठकीत निर्धारचामोर्शी :- गेल्या नवं वर्षांपासून चामोर्शी तालुक्यातील मार्कडा देव येथील मार्कडेश्र्वर देवस्थान जिर्णोद्धार काम भारतीय पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन, शासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षतेमुळे प्रलंबित असल्याने ते काम मार्गी लागणार नाही तो पर्यंत सुरू असलेले जनआंदोलन, साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार संत मुरलीधर महाराज यांनी व्यक्त केला आहे.
२० फरवरी रोजी सायंकाळी मार्कंडेश्र्वर देवस्थान परिसरात साखळी उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व भाविकांची बैठक घेण्यात आली होती त्या बौठकीत ते बोलत होते या बैठकीत. गोविंद सारडा, सुनील दीक्षित, अशोक पोरेडीवार, प्रमोद भगत, नारायण गंधेवार, , नामदेव किन्हेकर, मनोज हेबिज, विजय कोमेरवार राजू मोगरे, , मृत्युंजय गायकवाड, मुखरू शेंडे, मारोती उमलवार, उमेश पिटाले, अतुल भिरकुवार, घनश्याम आभारे, सुरेश बंडावार, सुनील देऊळवार, संतोष राऊत आदी उपस्थित होते .पुढे बोलतांना,
मी आपल्या प्रेरणेनी उपोषणाला बसलो आहे उपोषणाला मोठ्या संख्येने भाविक , भक्तांनी उपस्थित होत पाठिंबा देत आहात, पुढेही दिल्यास आपण जीर्णोद्धाराच्या लढ्यात इतिहास रचणार आहे यात शंका नसून, हा लढा माझा नसून विदर्भातील,व जिल्ह्यातील शिव भक्ताचा आहे. या लढ्याला साथ दिल्यास , माझे प्राण गेले तरी चालेल यातून माघार घेणार नसून जीर्णद्धाराचे पूर्ण करण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काम मार्गी न लागल्यास २८ फरवरी रोजी पुढील दिशा ठरवणार आहे. यावेळी अनेकांनी साखळी उपोषण नंतर पुढे कोणता निर्णय घेतला जाईल याबाबत आप आपले मत व्यक्त केले यावेळी गावातील महिला, पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page