Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीस्काऊटच्या शिक्षणातुन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी शिस्त रुजवावी-- शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले यांचे प्रतिपादन
spot_img

स्काऊटच्या शिक्षणातुन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी शिस्त रुजवावी– शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी चामोर्शी:- गडचिरोली येथे शिक्षकांचे सात दिवशीय निवासी प्राथमिक प्रशिक्षण…. यात २२ स्काऊट शिक्षक, २२ गाईड शिक्षिका, १० कब शिक्षक,०३ कब, स्काऊट ,व गाईडचे शिबिर प्रमुख ,१० सहाय्यक प्रशिक्षण प्रमुख असे एकूण ६७ शिक्षकांना निवासी प्रशिक्षण देण्यात आले.. स्काऊटचे शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यात राहून कृतीतून दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना देशाचा आदर्श नागरिक होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनामध्ये उपोजनात्मक असे हे शिक्षण आहे.त्यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी या स्काऊटच्या प्रशिक्षणातून शिक्षण घेऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांच्या सर्वांनी विकासासाठी केल्यास त्यातुनच विद्यार्थ्यांना शिस्त लागेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे शिक्षक आमदार तथा वि.मा.शि.चे विभागिय सरकार्यवाह सुधाकरजी अडबाले यांनी व्यक्त केले आहे.. गडचिरोली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळा येथे स्काऊट व गाईडचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.यावेळी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले,तर प्रमुख अतिथी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, प्राथमिक शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैभव बारेकर, माजी जिल्हा कमिशनर स्काऊट विनोदजी भोसले, जिल्हा मुख्यालय आयुक्त तथा मुख्याध्यापक शमशेर खाॅ पठाण, प्राचार्य तथा जिल्हा मुख्यालय आयुक्त लिनाताई हकीम,सिनेट सदस्य तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, राऊत सर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश नैताम, शाळेच्या मुख्याध्यापिका डांगेवार मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
स्काऊट व गाईड विभागाच्या शिक्षक शिक्षिकेंचे ७ दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न…. गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व जि. प. शिक्षण विभाग, गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्काऊट गाईड अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, सहकार्य व विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होऊन या अभ्यासक्रमातील संस्कारक्षम बाबी मुलांपर्यंत पोहचाव्यात या दृष्टीने दिनांक १२ ते १८ फेब्रुवारी,२०२४ या कालावधीमध्ये अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव, गडचिरोली येथे इ.१ ते ४ च्या शिक्षकांकरिता कब मास्टर व फ्लॉक लीडर तसेच इ. ५ ते १० करिता स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टनचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये एकूण ५५ प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत. शिबीर संचालक व जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट डॉ.बि.आर.आंबेडकर विद्यालय वायगावचे कालिदास बन्सोड, तर कब विभागाचे शिबीर प्रमुख रमेशजी बोबडे, तसेच शिबीर सहाय्यक तथा जिल्हा संघटक स्काऊट विवेकजी कहाळे, माजी प्राचार्य तथा सहाय्यक प्रशिक्षण आयुक्त वाय.आर.मेश्राम, सहाय्यक प्रशिक्षण आयुक्त मनोज निंबारते, सहाय्यक रमेश पुराम, खेमराज तिघरे यांनी केले. गाईड विभागाच्या शिबीर प्रमुख म्हणून श्रीमती सुनीता इथापे तर सहाय्यक तथा जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्रीमती कांचन देशमुखे, सहाय्यक तथा जिल्हा संघटक गाईड श्रीमती नीता आगलावे, श्रीमती ज्योती आत्राम व नीतू मालाकार यांनी सहाय्यक प्रशिक्षण आयुक्त म्हणून कार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांनी केले तर संचलन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड कांचन देशमुखे आणि आभार जिल्हा संघटक स्काऊट विवेक कहाळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पियुश,नंदनवार, प्रमोद पाचभाई, श्रीकृष्ण ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page