Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीमार्कंडेश्वर देवस्थानच्या जिर्णोध्दाराच्या कामासाठी साखळी उपोषणाला विविध संघटनांचां वाढता पाठिंबा
spot_img

मार्कंडेश्वर देवस्थानच्या जिर्णोध्दाराच्या कामासाठी साखळी उपोषणाला विविध संघटनांचां वाढता पाठिंबा

,
संत मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वातात उपोषणाला चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद
चामोर्शी: – तालुक्यातील मार्कडेश्र्वर देवस्थानचे रखडलेले काम मागील नवं वर्षांपासून भारतीय लोकप्रतिनिधीचे व पुरातत्व खात्याच्या दुल्क्षतेमुळे अद्याप पूर्ण झाले नाही त्यासाठी हरनघाट येथील सतं मूर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात १६ फरवरीला सायंकाळी मार्कडा देव येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आज चौथ्या दिवशीही विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले माकंदेश्र्वर देवस्थान चे जीर्णोध्दार काम व्हावे म्हणून वेळोवेळी सामाजिक संघटना यांच्याद्वारे सतत मागणी केली पण काम सुरू झाले नाही त्यासाठी १६ फरवरी ला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता निवेदन देताना जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चेत मार्ग निघू शकला नाही चर्चा निष्फळ ठरली. म्हणून १६ फरवरीला सायंकाळी मार्कडा देव मंदिर परिसरात संत मूर्लीधर महाराज व सुनील महाराज शास्त्री यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले १९ फरवरी ला उपोषणाच्या चौथ्या दिवशीही विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून तिसऱ्या दिवशी शिवनाथ कुंभारे, विजय खरवडे, नरेंद्र जक्कुलवार, मुकेश गुरणुले, मारोती उमलवार, कालिदास पाल, नामदेव किनेकार, उमेश पटले आदी व चौथ्या दिवशी.भारत स्वाभिमान पतंजली योग समितीचे पदाधिकारी यांनी साखळी उपोषणा बसून पाठिंबा दिला तर मार्कडा देव येथील ग्रामस्थानी कालच ऐक बैठक घेऊन या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे
बाक्स:
भारत स्वाभिमान पतंजली योग समितीचा साखळी उपोषणाला पाठिंबा
मार्कडेश्र्वर देवस्थान जीर्णोद्धार प्रलंबित काम सुरू करण्यासाठी संत मूर्लीधर महाराज यांनी साखळी उपोषण सुरू केले त्या उपोषणाला भारत स्वाभिमान पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अशोक पोरडीवार, महीला पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी मंदाताई वरघंटे, संघटन मंत्री विलास गण्यारपवार, अनिता पोरेडीवार, संजय कान मापल्लीवार, दिनकर लाकडे, ताराबाई उईके, कमलाबाई येनप्रेडीवार, ननी हलदार, नत्तू बर्लावार, राउजी हीचामी, योक शिक्षिका सुलता गायाली आदीनी आजसाखळी उपोषणाला बसून पाठिंबा दिला आहे. काम सुरू न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्यावर ठाम
अन्नत्याग आंदोलन बाबत संपर्क साधला असता त्यांनी, मार्कडेश्र्वर देवस्थानच्या जिर्णोद्धार कामाला प्रारंभ करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी निवेदन देऊन काम सुरू करण्याविषयी चर्चा करण्यात आली मात्र ती चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे १६ फरवरी पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे मात्र काही लोकप्रतिनिधीनी महाराज अन्नत्याग आंदोलचां निर्णय मागे घेतला म्हणून बातम्या पसरवीत आहेत त्या बातम्या दिशाफुल करणारे असून भविकात संभ्रम निर्माण करणारे आहे काम सुरू झाले नाही तर ठरल्या वेळी अन्नत्याग आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे सांगितले
संत मूर्लीधर महाराज, स्थित मार्कडा देव
संत जीवनदास महाराज ट्रस्ट मार्कंडा देव यांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page