Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीशेडमाके विद्यालयाच्या वतीने विमाशी पदाधिकाऱ्यांचा सत्कार
spot_img

शेडमाके विद्यालयाच्या वतीने विमाशी पदाधिकाऱ्यांचा सत्कार


चामोर्शी :- शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आमगाव महाल च्या वतीने नुकताच पार पडलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शीच्या कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार आणि सहाय्यक शिक्षक सुवेंदू मंडल , चंदू सातपुते ,अनिल निमजे , जगदीश दास , विशाल मंडल , रोशन वासेकर , प्रा . किशोर पोहनकर , एस सेगम , श्रुती मोतकुरवार , तिरुपती बैरवार , रतन सिकदर आदीच्या उपस्थितीत एकाच शाळेतील चार जणांना तालुका कार्यकारिणी मध्ये विविध पद मिळाल्याबद्दल विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष गजानन बारसागडे , प्रसिद्धीप्रमुख गणेश कोपुलवार , सदस्य रुचिता बंडावार , अभिषेक ढोंगे यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी प्राचार्य अनिल गां गरेड्डीवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीच्या व चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर पोहनकर तर आभार विशाल मंडल यांनी मानले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page