Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीशिवाजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
spot_img

शिवाजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


चामोर्शी:- स्थानिक शिवाजी विद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य अनिल आकेवार, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक ज्योती सेलूकर, गणेश कोल्हटवार व विदयालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्तित होते. याप्रसंगी प्राचार्यानी व विद्यार्थांनी मनोगतातून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून जीवनात त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा असे सांगितलं. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलं. संचालन क्रीडा शिक्षक राकेश खेवले तर आभार विष्णू ब्राह्मण यांनी केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page