Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरपक्षाशी एकनिष्ठा व निस्वार्थ राजकारणामुळे वामनराव ठरले 'नेता नंबर वन'
spot_img

पक्षाशी एकनिष्ठा व निस्वार्थ राजकारणामुळे वामनराव ठरले ‘नेता नंबर वन’

त्या’ बॅनरची सर्वत्र चर्चा.
राजुरा:- 19 फेब्रुवारी लोकशाही व्यवस्थेत राजकीय पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.लोकप्रतिनिधी सभागृहात कायदे बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो.पण सध्या राजकर्त्यांनी राजकारणाला गलिच्छ केल्याचे एक ना अनेक उदाहरण पहायला मिळत आहे. नीतिमत्ता व पक्षनिष्ठा बोलण्यासाठीच असते ही सत्यता अनेक नेत्यांनी दाखवून दिली आहे.सत्तेची लालसा व भ्रष्टाचार केल्यानंतर तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागल्यानंतर नेते क्षणाचाही विलंब न करता पक्षप्रवेशा साठी उडी मारतो. त्यांची उडी माकडांनी लाजवेल एवढी लांबलचक असते.मात्र या कलुषित राजकारणात माजी आमदार वामनराव चटप यांनी मंत्रीपद व खासदारकीची ऑफर झुगारून पक्षानिष्ठेचा परीचय दिला आहे. तब्बल ४३ वर्ष शेतकरी संघटनेशी प्रामाणिक राहून जनतेचे हित जोपासत निष्कलंकीत राजकारणी म्हणून पुढे आले आहे. त्यामुळेच फाटाफूटी व संधीसाधू राजकारणात वामनराव ‘नेते नंबर वन’ ठरले आहे.सध्या त्यांचे हेच बॅनर लक्ष वेधून घेत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात अनेक चढउतार पहायला मिळत आहे. नेते कधी व कुठे जाईल याचा नेम नाही.सत्तेत असतांना जनतेच्या हितापेक्षा स्व हित जोपासत फक्त ‘मलाई’ खाण्याप्रयन्त राजकारण केले जाते असे अनेक नेत्यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर त्या नेत्यांच्या मागे यंत्रणा लागली की त्यांना ‘देव’ आठवतो.तुरुंगात जाण्यापेक्षा पक्षनिष्ठेला लाथ मारून अन्य पक्षात प्रवेश करण्यासाठी ‘लगीनघाई’ करणारे अनेक नेते पहायला मिळत आहे.पक्ष प्रवेशानंतर शांत व सुखाची झोप लागते असे काही काही नेत्यांनी बोलून देखील दाखवले आहे. हे बोलत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरचा ‘भाव’ स्पष्ट पहायला मिळतो.मुळात गैरव्यवहार केला म्हणूनच नाही तर सत्तेची जिज्ञासा देखील उडी मारण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. मात्र या गलिच्छ व नासलेल्या राजकीय व्यवस्थेत माजी आमदार वामनराव चटप यांनी मात्र तोल जाऊ न देता संघटनेशी एकनिष्ठेची बांधिलकी जोपासली आहे. राजुरा मतदारसंघातील वामनराव हे वेगळेच राजकीय रसायन आहे.सुरवातीपासूनच ते शेतकरी संघटनेशी जुळलेले नेते आहे.शेतकरी व शेतीला केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारण केले आहे. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे याच सूत्राखाली त्यांनी राजकारण केले.या दरम्यान त्यांच्यावर जनतेनी विश्वास दाखवला व तीनवेळा आमदार झाले.सभागृहात सडेतोड बाजू मांडून अनेक कायदे तयार करण्यासाठी हातभार लावला. सर्वच विषयांत त्यांचाच आवाज बुलंद राहायचा.याच आमदारकीच्या काळात त्यांनी राजकारणातील अनेक चढउतार पाहिले.टोकावरच्या बहुमत प्रस्तावावेळी त्यांना अनेक ऑफर आले.राज्यसभा निवडणुकीत सुध्दा प्रलोभने देण्यात आली. मंत्रीपद,खासदारकी देण्यासाठी मनधरणी करण्यात आली. पण वामनराव यांनी संघटनेची बांधिलकी सोडली नाही.किंबहुना मनात लालसा न येऊ देता विचारधारेशी बेईमानी केली नाही.संघटनेशी प्रामाणिकपणा व स्व शरद जोशी यांच्या विचारांशी जुळून काम केले.आजच्या सारख्या संधीसाधू राजकारणात त्यांनी खूप काही मिळवता आले असते पण तत्त्वाशी फारकत घेतली नाही.आजही त्याच संघटनेशी एकनिष्ठ राहून विचारांची लढाई लढत आहे.निष्कलंकीत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख कायम ठेवली आहे. त्यांनी मलाईच्या पदाचा झुगारून निस्वार्थ भावनेने राजकारणात ठसा उमटवला आहे.म्हणूनच त्यांची छबी स्वच्छ व निर्मल असल्याने फाटाफूटी च्या राजकारणात ते नेते नंबर वन ठरले आहे. त्यांच्या याच प्रामाणिकपणा व विचारधारेवर प्रकाश टाकणारा फलक जनतेचे लक्ष वेधून घेत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page