Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीविमाशीची चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत
spot_img

विमाशीची चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत


तालुका अध्यक्ष – गजानन बारसागडे तर कार्यवाह – पोपेश्वर लडके
चामोर्शी :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शीची कार्यकारिणीची निवड गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे , जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर , जिल्हा उपाध्यक्ष संजय कुनघाडकर ,माजी सहकार्यवाह ईतेंद्र चांदेकर ,सदस्य विनोद सालेकर आणि भुवन जुमनाके यांचे उपस्थितीत चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली . यावेळी प्रथमतः माजी कार्याध्यक्ष स्व . कैलाश भोयर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . तदनंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते चामोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून गजानन बारसागडे ,कार्याध्यक्ष संजय आलेवार , कार्यवाह पोपेश्वर लडके, उपाध्यक्ष महेंद्र किरमे , हास्यविनोद उंदीरवाडे , स्मिता चट्टे, रवींद्र उराडे तर सहकार्यवाह किसनदेव टिकले ,अशोक टिचकुले , संतोष बोडूकवार , कु . सोनाली निखाडे तर कोषाध्यक्ष अरविंद कुनघाडकर , प्रसिद्धी प्रमुख गणेश कोपुलवार , संघटन सचिव सुरेश भांडेकर , ज्ञानेश्वर शिवणकर , सदस्य अतुल येलमुले , सौ . वर्षा लोहकरे , सौ . रुचिता बंडावार , अभिषेक ढोंगे ,मिलिंद उराडे ,मोहनदास चहारे , प्रविण नैताम ,देवानंद उराडे , रुपेश अमलपुरिवार, सोहम माहोरकर, आबाजी वाघाडे ,महेश बोरकर आदींचे निवड करण्यात आली .
विशेष म्हणजे ह्या कार्यकारीणीची निवड बिनविरोध झाली . त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .तदनंतर या कार्यकारिणीने तालुक्यातील शिक्षकांच्या समस्येला वाचा फोडून उचित न्याय देण्यासाठी आणि वेळोवेळी शिक्षकांच्या विविध मागण्या शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत तसेच संघटनेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कार्य तत्पर राहावे अशी अपेक्षा जिल्हा कार्यवाह अजय लोंढे यांनी व्यक्त केली .
सूत्रसंचालन संजय कुनघाडकर यांनी तर आभार संजय आलेवार यांनी मानले .
यासाठी विभाशी तालुका चामोर्शीच्या पदाधिकार्यांनी मोलाचे सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page