Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरयुवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.किशोर कवठे
spot_img

युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.किशोर कवठे

गोंडवाना विद्यापीठात २१ व २२ फेब्रुवारीला साहित्य संमेलन

राजुरा:– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने २१ व २२ फेब्रूवारीला युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून राजूरा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.किशोर कवठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठात आयोजित या दोन दिवसीय साहित्य संमेलनात विदर्भ-राज्यातील साहित्यिकांचा सहभाग राहणार असून परिसंवाद, कवी संमेलने, मुलाखत यासह भरगच्च साहित्यिक कार्यक्रमाचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील डॉ.किशोर कवठे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अध्यापक असून कवी, स्तंभलेखक, निवेदक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. त्यांचे बहुचर्चित पसरत गेलेली शाई, दगान, गावसूक्त, विराणी हे काव्यसंग्रह, ऐसा चेतला अभंग हा संपादित अभंगसंग्रह, दिशा अंधारल्या जरी हा ललित संग्रह, संवेदनशील लोकनेता दादासाहेब देवतळे हा चरित्रसमीक्षा ग्रंथ आदी पुस्तके प्रकाशित आहे. त्यांच्या विविध पुस्तकांना राज्यातील नामांकित पुरस्कारांनी गौरविले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक, सामाजिक योगदान डॉ.कवठे यांनी दिले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page