Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीओम साईरामच्या गजराने पालखी व शोभा यात्रेने शहर दुमदुमले
spot_img

ओम साईरामच्या गजराने पालखी व शोभा यात्रेने शहर दुमदुमले


श्री साई मंदिर प्रथम स्थापना दिवस सोहळानिमित्त विविध कार्यक्रम. लक्ष्मी गेट जवळून पालखी व शोभा यात्रा
चामोर्शी:-
श्री साई बाबा व्यवस्थापन समितीच्या वतीने 14फेब्रुवारी 2024 ला रविभाऊ बोमनवारयांनी स्थापित साई मंदीर स्थापनेला ऐक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सकाळी लक्ष्मी गेट जवळून ढोल ताशांच्या गजरात ओम साई रामच्या गजराने पालखी व शोभा यात्रेने शहर दुमदुमले होते तर दिवसभर श्री साई बाबांच्या गाण्याच्या धूनिने वातावरण भक्तिमय झाला होता.
येथील हरडे मंदिराजवळील श्री साई मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, फुलांनी व रांगोळीने सजविन्यात आले होते साई मंदिर स्थापनेला ऐक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आज सकाळी ०८ वाजता श्री साई बाबा ची अभिषेक व पूजा रवीभाउ बोमनवार व छाया रविभाउ बोमनवार सपत्नीक यांचे हस्ते करण्यात त्यावेळी पुजारी अमोल महाराज. आमगावकर यांनी पूजा अर्चा मंत्रउच्चारत सांगितली त्यावेळी अभिषेक बोमनवार, नम्रता बोमनवार आदी परिवारातील सदस्य होते तर येथील लक्ष्मी गेट जवळून १०..३० वाजता ढोल ताशांच्या गजरात श्री साई बाबा ची पालखी व शोभा यात्रा मंदिरा पर्यंत काढण्यात आली त्यावेळी हिरवा रंग असलेली साडी परिधान केलेल्या महीला या शोभा यात्रेचे खास आकर्षण होते ११ वाजता हवन, तर दुपारी १.३० महाआरती,३.३० वाजता साई चरित्र पारायण, तर सायंकाळी ५ वाजता चिमुकल्या मुलांसह महीला द्वारा साईच्या जीवनावर आधारित लघु नाटिकाचां उपस्थित भक्तांनी आनंद घेतला त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आल्यानंतर शेवटी ब्रम्ह चैतन्य वारकरी भजन मंडळ पथकाचा भजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमला नरेंद्र चंन्नावार, पराग पोरेडीवार, ज्योती चंन्नावार रायपूर, अनुप पोरेडीवार चंद्रपूर , यांनी कार्यक्रमात सहभागी होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई बाबा व्यवस्थान समिती,व उत्सव समितीचे सर्व पदाधिकात्यांनी सदस्य सहकार्य केले याप्रसंगी पुरुष व महिला साई भक्तमोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page