Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीस्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली तर्फे चामोर्शी येथे कॅन्सरविरोधी जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा
spot_img

स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली तर्फे चामोर्शी येथे कॅन्सरविरोधी जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा


चामोर्शी – ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली तर्फे चामोर्शी येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी कॅन्सर विरोधी जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .ही १८ ते २५ वर्षे वयोगट तर दुसरा गट २५ वर्षावरील अशा दोन गटामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कर्करोग विरोध जनजागृतीसाठी स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत चामोर्शीवासीयांचा उत्स्फूर्त सहभाग होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी नगरपंचायतच्या अध्यक्षा जयश्रीताई वायलालवार, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे , पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार,ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ विधान देवरी , जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका तांबडे मॅडम ,महिला व बालकल्याण सभापती गीताताई सोरते ,उपसभापती स्नेहा सातपुते, नगरसेविका वर्षा भिवापुरे , सखी मंच संयोजिका सिमा खोबे, रश्मी वाळके , जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर व त्यांचे सहकारी तसेच चामोर्शी नगरवासी उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येक स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चढाओढ दिसत होती .त्यांच्या उपस्थितीत सर्व स्पर्धकांनी एकमेकांच्या साथीने आपले लक्ष्य गाठण्यात यश मिळवले .
या स्पर्धकांनी तीन किलोमीटरचे अंतर काही मिनिटात पूर्ण केले. कर्करोगविरोधी जनजागृतीसह लोकांमध्ये सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज आहे त्यासाठी खानपानाच्या सवयी बदलून शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जोपासणे ही सुद्धा गरजेचे आहेत हा संदेश आरोग्य विभागाच्या अधिकारी यांनी कॅन्सर कसा टाळता येतो व कसा ओळखावा याबाबत मार्गदर्शन केले . केस आणि नख सोडले तर आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर कॅन्सर होऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना व नगरवासीयांना जागृत केले . ही मॅरेथॉन हत्ती गेट ते घोट – आष्टी हनुमान मंदिर परत हनुमान मंदिर ते हत्ती गेट असे एकूण तीन किलोमीटरचे अंतर स्पर्धकांना पार करायचे होते .ते अंतर स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात पार करून कॅन्सर विरोधी जनजागृती मॅरेथॉन या उपक्रमात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासली. युवक, युवती, महिला ,पुरुष यांचा उत्साह लक्षणीय होता. २५ वर्षावरील पुरुष वयोगटात प्रकाश मिरी यांनी प्रथम तर द्वितीय पारितोषिक संपतराव इस्टाम यांनी पटकाविले. महिला गटात प्रथम पारितोषिक मनिता सहाडा तर द्वितीय पारितोषिक करुणा घ्यार यांनी पटकविले. तर १८ वर्षावरील पुरुष गटात प्रथम पारितोषिक नागेश्वर रस्से प्रथम महिला विजेती पायल दूधबळे यांनी पटकाविले या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर उज्वला घागरगुंडे यांना प्रोत्साहनपर रोख रक्कम व प्रमाणपत्र , कविता साबळे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .शाळेचे प्राचार्य आशुतोष लोंढे उपप्राचार्य शैलेश आकरे शाळेचे व्यवस्थापक शंकरप्रसादजी अग्निहोत्री ,जॉइंट सेक्रेटरी अविनाश सेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लाड यांनी केले तर आभार पल्लवी शांतलवार यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page