Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीसणानापूर गाव महसुली गाव पेसा क्षेत्रामधून वगळण्याची मागणी------------मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन
spot_img

सणानापूर गाव महसुली गाव पेसा क्षेत्रामधून वगळण्याची मागणी————मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन


चामोर्शी :-
तालुक्यातील सणानापूर (भेंडाळा ) हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून पेसा क्षेत्रात असून या गावाला पेसा क्षेत्रांतून वगळण्यात यावे या मागणीचे निवेदन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना ३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले की , महाराष्ट्र शासनाने सन १९९६ पासून अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेल्या गावांचा समावेश पेसा क्षेत्रातमध्ये करण्यात आला.त्यात सगणापूर (भेंडाळा ) गावाचा समावेश आहे. पेसा क्षेत्रात गावांचा समावेश करताना प्रामुख्याने त्या गावची अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त पाहिजे असताना सुद्धा सगणापूर गावची अनुसूचित जमातीची लोकसंख्या ९.६१ टक्के असताना गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. तर इतर जातीची लोकसंख्या ही ९०.४० टक्के आहे असे असताना सुद्धा गावाचा चुकीने पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आला हे गाव पेसा निकषांमध्ये बसत नसल्याने सदर गाव पेसा क्षेत्रांतून वगळण्यात यावे अशी निवेदनातून मागणी होत आहे.
निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य धनराज सेलोटे ,रवींद्र चुनाकर ,मोहनदास भाकरे ,नरेश घेर ,मुखरेश्वर तांगडे ,मल्ला माचेवार ,सुभाष चुनारकर ,रवींद्र पोरटे ,प्रभाकर पोरटे , पंढरी सेलोटे यांनी केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page