Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीशालेय कलामंचामुळेच विद्यार्थ्यांची कला जोपासली जाते--राहूल नैताम यांचे प्रतिपादन
spot_img

शालेय कलामंचामुळेच विद्यार्थ्यांची कला जोपासली जाते–राहूल नैताम यांचे प्रतिपादन


चामोर्शी :- शाळांमध्ये घेतले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांच्या आंतरिक कलागुणांना प्रोत्साहन मिळते व एक उत्तम व्यासपीठ तसेच कलामंच कला सादर करण्यासाठी उपलब्ध होत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने या सांस्कृतिक कला वारशांचे पाईक व्हावे व सहभागी होऊन आपल्या कलात्मकतेचा तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन करून सामाजिक दायित्व स्विकारण्याची गरज असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक नगर पंचायत चामोर्शीचे राहुलभाऊ नैताम यांनी शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आमगाव महाल येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी गौरव गौरवोद्गार काढले ते कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरीक सिताराम पाटील गावतुरे , सहउद्घाटक केंद्रप्रमुख वंदना ठवरे केंद्र आमगाव महाल , सरपंच जोत्सनाताई गव्हारे , पोलीस पाटील साईनाथ गावतुरे , पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोठारे ,भाऊराव देवतळे , वैशाली आदे , निर्मला वासेकर , जयश्री सोनटक्के , वंदना बैस ,आरोग्य अधिकारी कालिदास शाहा , सेवानिवृत्त शिक्षक नरेंद्र चिटमलवार , कविता पुण्यपकार , तमुअ आकाश बोदलकर , कल्पना चलाख , भाडबिडीच्या सरपंच पार्वतीबाई गावडे , आशा सेविका सरिता नैताम ,प्रतिष्ठित नागरिक पुंडलिकराव जुवारे ,प्रेमदास कुनघाडकर , जागरूक पालक सुंदरसिंग साबळे , माजी सरपंच भाविकाताई देवतळे , माजी उपसरपंच शालुताई सातपुते , कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार आदी उपस्थित होते .
याप्रसंगी शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले . यात वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , कबड्डी , व्हॉलीबॉल थ्रोबॉल , रस्सीखेच , मॅराथान अशा अनेकविध स्पर्धांचे बक्षीस मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले .
याप्रसंगी सह उद्घाटिका वंदना ठवरे , सरपंच जोत्सनाताई गव्हारे , शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष सुभाष कोठारे यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे आणि प्रा. किशोर पोहनकर , प्रास्ताविक प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार , गणेश वंदना व नांदी चंदू सातपुते तर आभार गणेश कोपुलवार यांनी मानले .
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संगणक तज्ञ म्हणून अभिषेक ढोंगे , विशाल मंडल , रोशन वासेकर , सुवेंदु मंडल , पुरुषोत्तम गुरनुले , रुचिता बंडावार , प्रा . श्रुती मोतकुरवार , प्रा . एस . सेगम , स्वप्नील गुज्जलवार ,सुरेश केळझरकर , अनिल निमजे ,जगदीश दास ,लीलाधर दुधबळे , तिरुपती बैरवार ,रतन सिकदार आदींनी मोलाची भूमिका बजावली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तसेच गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page