Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीसांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत शहरातील २१ शाळा, महाविद्यालये सहभागी
spot_img

सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत शहरातील २१ शाळा, महाविद्यालये सहभागी


चामोर्शी नगर पंचायतचां पुढाकार
चामोर्शी – नगरपंचायत प्रशासनाच्या पुढाकारातून २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चामोर्शी शहरातील २१ जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय यांचे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत घेण्यात आले त्यात २१ शाळा महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.

  यामध्ये तीन गट ठेवण्यात आले होते . तिन्ही गटातील प्रथम , द्वितीय, तृतीय असे रोख पारितोषिक व सहभागी असलेल्या सर्व शाळा , महाविद्यालय यांना प्रोत्साहन पर रोख बक्षीस वितरण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर रसिकांची मने जिंकली व असंख्य बक्षिसांची व रोख&; पारितोषिकाची लयलूट केली . 

या सांस्कृतिक कार्यक्रमाला नगरपंचायतचे नगराध्यक्षा जयश्री वायलालवार ,उपाध्यक्ष लोमेश बुरांडे , बांधकाम सभापती वैभव भिवापूरे ,पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम , महिला व बालकल्याण सभापती गीताताई सोरते , उपसभापती स्नेहा सातपुते,पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील ,मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, कर निरीक्षक भारत वासेकर ,नगरसेवक सुमेध तुरे ,नगरसेविका वर्षा भिवापूरे ,काजल नैताम , प्रेमा आईचवार वंदना गेडाम ,माधुरी व्याहाडकर हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले .परीक्षक म्हणून अभिषेक वाडके , अनिकेत नैताम , आचल चलकलवार यांनी केले .
बॉक्स- प्राथमिक गट – प्रथम बक्षीस -डिज्नीलैंड स्कूल चामोर्शी , द्वितीय बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरपूर हेटी , तृतीय बक्षीस -बा म सहारे शाळा व जिल्हा परिषद नूतन शाळा यांना सामुहिक बक्षिस
माध्यमिक गट-प्रथम बक्षीस जा कृ. बोमनवार विद्यालय, द्वितिय बक्षीस – डिज्नीलैंड ॲन्ड प्रेसिडेन्सी हायस्कूल , तृतीय बक्षीस – राजमाता राजकुवर आश्रम शाळा
महाविद्यालयीन गट – प्रथम बक्षीस जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, द्वितीय बक्षीस – जा. कृ. बोमनवार कनिष्ठ महाविद्यालय ,तृतीय बक्षीस – राजश्री शाहू महाराज स्कूल ऑफ सायन्स व कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय यांना सामूहिक बक्षीस देण्यात आले .

    रोख बक्षीस प्रथम तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये व तृतीय बक्षीस एकहजार रुपये याप्रमाणे देण्यात आले .व सहभागी सर्व शाळांना पाचशे रुपये प्रमाणे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राकेश खेवले तर आभार प्रदर्शन लिपिक विजय पेद्दीवार यांनी पार पाडले .सांस्कृतिक कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती या कार्यक्रमाकरिता नगरपंचायत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page