Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीवाचाल तर वाचाल, ज्ञान मिळवाल तर यशस्वी व्हाल." : प्रा. डॉ. पवन...
spot_img

वाचाल तर वाचाल, ज्ञान मिळवाल तर यशस्वी व्हाल.” : प्रा. डॉ. पवन नाईक

चामोर्शी :- “पुस्तकाने मस्तक सुधारते, सुधारलेले मस्तक कुणाचेही हस्तक होत नाही आणि कुणासमोर नतमस्तकही होत नाहीत. अडथळे संधी निर्माण करण्यासाठी येतात. अडथळे आहेत म्हणजे काहीतरी चांगले करण्याची संधी सुध्दा आहे त्यामुळें माणसाने परिस्थिचा बाऊ करत बसू नये.” असा ध्येयवादी सकारात्मक उपदेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.पवन नाईक यांनी विद्यार्थ्यांना दिला. कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी येथील वार्षिक युवा महोत्सव, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय व बक्षीस वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.

          गोंडवाना विद्यापीठ संलग्नित श्री. शिवाजी शिक्षण मंडळ गडचिरोली, द्वारा संचालित कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे "युवा महोत्सव" क्रिडा व संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण सोहळा दिनांक २६ जानेवारी रोजी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला... 

      कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. डी. एन. चापले, सदस्य श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. डॉ. पवन नाईक, विभागीय समन्वयक रा.से.यो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा. श्री. लोमेशजी बुरांडे, उपाध्यक्ष, नगर पंचायत,चामोर्शी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री, प्रा. संजय म्हस्के, से. नि. संचालक शारीरिक शिक्षण विभाग, के. डी. डी. महाविद्यालयं चामोर्शी, हे होते. तसेच महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वैभव एस.म्हस्के व प्रभारी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. दिपक बाबनवाडे कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा. डॉ. पवन नाईकz विभागीय समन्वयक रा.से.यो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, यांना २०२१-२२ या वर्षातील मा. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या विशेष उपलब्धिसाठी त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

        याप्रसंगी सोहळ्याला उपस्थित सर्व प्रमुख अतिथी,मान्यवरांच्या हस्ते क्रिडा व संस्कृतिक युवा महोत्सवामधील विविध स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांचे तसेच वर्षभरातील महाविद्यालयीन विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

   कार्यक्रमाच्या अतिथी स्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांनी युवा महोत्सवाच्या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा घेऊन विद्यार्थांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोशन गेडाम यांनी केले, बक्षीस वितरणाचे संचालन प्रा. डॉ. प्रसेन ताकसांडे यांनी केले तर आभार प्रा. वैशाली कावळे यांनी मानले   

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. आर. डी. बावणे, प्रा. डॉ. आर. एम. झाडे, डॉ. बी. डब्ल्यू. आंबेकर, प्रा. अरुण कोडापे, प्रा. वंदना थुटे, प्रा. वैशाली कावळे, प्रा. संकेत राऊत,प्रा. डिंपल झाडे, प्रा. जयश्री बोबटे, प्रा. शुभांगी खोबे, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page