Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
spot_img

बोमनवार विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

चामोर्शी – श्री गुरुकृपा समाजसेवी संस्था चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक जा.कृ.बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन, नृत्य कार्यक्रम उत्साहात पार पडला .
संस्थेचे उपाध्यक्ष प्र.सो.गुंडावार गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दोन नृत्य सादर करण्यात आले. या नृत्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली. नृत्याचे संचालन – मृणाल तुमपल्लीवार तर आभार प्रदर्शन – छाया ओल्लालवार यांनी केले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा – छायाताई बोमनवार, संचालक – अभिषेक बोमनवार ,संचालिका – नम्रता बोमनवार ,संचालक मंडळ, शाळा समितीचे सदस्य – सुधाकर गद्देवार, पालक शिक्षक संघाचे ,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , प्र.प्राचार्य इतेंद्र चांदेकर, प्राध्या.नमूदेव कापगते ,प्राध्यापक ,शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, पथक प्रमुख, पालक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय चामोर्शीद्वारा घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत संचिता भूपेंद्र बांबोळे वर्ग 11 विज्ञान हिने तृतीय क्रमांक पटकाविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, सर्वांनी तिचे अभिनंदन केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page