Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरप्रजासत्ताक दिनी एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र संचालकांचा केला...
spot_img

प्रजासत्ताक दिनी एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र संचालकांचा केला सत्कार.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे आयोजन. कृषी व ग्रामीण पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार व पर्यावरणाचे संवर्धन, ग्रामीण संस्कृतीचा जपला वारसा.

बादल बेले राजुरा २७ जानेवारी :-

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे राजुरा तालुक्यातील चनाखा येथील एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात या केंद्राचे संचालक रिंकू मरस्कोल्हे, उर्मिला मरस्कोल्हे, नितिन मुसळे , शुभांगी मुसळे, रूपेश शिवणकर, सुहास आसेकर , तसेच मोकळा श्र्वास पर्यटन केंद्र सुरू झाल्यापासून तिथे सेवा देणारे अनिल वांढरे,लीलाताई इप्पावार
यांचा शॉल, श्रीफळ, वृक्ष कुंडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन , खाद्यपदार्थ, बैलगाडीतुन फेरफटका, साहसी तसेच विविध खेळ, विविध फुल-फळ झाडांची प्रत्यक्ष माहिती, पाण्यातील मनोरंजन अश्या विविध मनोरंजनात्म बाबींनी पर्यटनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक याठिकाणी भेटी देत आहेत. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने पर्यावरणाला बाधा पोहचली आहे. परंतु पडीत जागेचा योग्य उपयोग करून अत्यंत चांगले कृषी व ग्रामीण पर्यटन उभारून नागरिकांना याचा लाभ मिळवून देत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेफडो संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोहनदास मेश्राम, अविनाश दोरखंडे, सुवर्णा बेले, संगीता पाचघरे, सचिन मोरे, वर्षा कोयचाडे, सुमैया शेख, मंदा सातपुते, अंजली गुंडावार, प्रणाली ताकसांडे, संदीप आदे, भास्कर करमनकर,आसिफ सैय्यद, श्रीरंग ढोबळे, लता कुळमेथे, दूर्वा बेले,आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या नागपूर विभाग उपाध्यक्षा सुनैना तांबेकर यांनी केले. तर आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले.

कोट
बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
पर्यावरण संवर्धनासोबतच कृषी व ग्रामीण पर्यटन तसेच स्थानिकांना रोजगार, ग्रामीण सांस्कृतिचे दर्शन, मनोरंजनात्मक साहसी खेळ, अतिशय मनमोहन असे हे पर्यटन केंद्र परिश्रमाने तयार करणाऱ्या या संचालकांचे सत्कार करताना आम्हाला आनंद झाला. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हेच आम्हचे उद्दिष्टे असून त्याकरिता अश्या होतकरूंचे सत्कार होणे आवश्यक असल्याचे मत बादल बेले यांनी व्यक्त केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page