Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरगांधी भवन येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.
spot_img

गांधी भवन येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात.

राजुरा (ता.प्र) :– २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ७ : ३० वाजता चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे ध्वजारोहण करण्यात आले. आ. धोटे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजुरा तालुका काँग्रेस कमेटी कार्यालय येथे ध्वजारोहण करून क्षेत्रातील जनतेला भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, अॅड. सदानंद लांडे, अॅड. अरूण धोटे, अशोकराव देशपांडे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष सय्यद सकावत अली, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, श्याम बोलमवार, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, साईनाथ बत्कमवार, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, कृष्णा खामनकर, वसंता ताजने, पंढरी चन्ने, संदेश करमरकर, डॉ. उमाकांत धोटे, अशोक चैनानी, सागर लोहे, सारंग गिरसाळवे, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, अॅड. प्रशांत अटाळकर, कविता उपरे, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, इंदूताई निकोडे यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page