Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरइन्फंट च्या विद्यार्थ्यांची पथनाट्यद्वारे मोबाईलचे सदुपयोग आणि दुरुपयोग विषयी जनजागृती.
spot_img

इन्फंट च्या विद्यार्थ्यांची पथनाट्यद्वारे मोबाईलचे सदुपयोग आणि दुरुपयोग विषयी जनजागृती.

राजुरा (ता. प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या वतीने राजुरा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथनाट्य सादरीकरणाद्वारे मोबाईल वापरण्याचे सदुपयोग आणि दुरुपयोग याविषयी जनजागृती करण्यात आली. सध्या लोकांच्या मनात आपल्या मुलांच्या सतत मोबाईलचा वापराबाबत व त्यांच्या आरोग्याबाबत विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात सुधारणा व्हावी त्यासाठी या पथनाट्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. राजुरा येथील पंचायत समिती चौक, नाका नंबर 3, गांधी चौक व जुना बस स्टॉप या ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पथनाट्यात इयत्ता ६ वी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही संकल्पना मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांची असून त्यासाठी विद्यार्थ्याकडून सतत सराव घेण्याचे कार्य रिता शर्मा, रीना कोरी, मयुरी पडवेकर, तसेच सुभाष पिंपळकर, विजय डोंगरे, विनोद नगराळे या सर्व शिक्षकांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page