Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीशिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून अविरतपणे काम करणारी संघटना म्हणजे विदर्भ...
spot_img

शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून अविरतपणे काम करणारी संघटना म्हणजे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना होय– आमदार सुधाकरराव अडबाले यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी गडचिरोली:-
गेली अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षकांच्या समस्यानां न्याय देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून अविरतपणे लढणारी व कृतीतून प्रत्यक्ष काम करणारी संघटना म्हणजेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना होय .असे विचार आपल्या मार्गदर्शनातुन उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे सदस्य तथा संघटनेचे सहकार्यवाह आमदार सुधाकरजी अडबाले यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की,आपण शिक्षक आमदार झाल्यापासुन शिक्षकांच्या अनेक समस्यां सभागृहात उपस्थित करून शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. याहीपुढे ज्या समस्या अजुन पर्यंत मार्गी लागल्या नाहीत. आपल्या हक्काचा आमदार म्हणून त्यांना पूर्णतः न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अधिवेशन कुरखेडा तालुक्यातील कुथे पाटील माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय गोठनगाव येथे आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यु.डायगव्हाणे, तर प्रमुख अतिथी म्हणून कुथे पाटील संस्थेचे संस्थाध्यक्ष योगराज पाटील कुथे, स्वागताध्यक्ष. कुंडलीक बगमारे,विज्युक्ता महासचिव डॉ.अशोक गव्हाणकर, माजी प्राचार्य जयंतराव येलमुले,होमराज कापगते, माजी प्राचार्य शेमदेव चाफले, गुरुदेव नवघडे, जगदीश जुनघरे, प्रांतीय अध्यक्ष रमेश काकडे, धनपाल मिसार, यादव धानोरकर,कृपाल मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, माजी कार्याध्यक्ष कैलास भोयर, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रांतीय, जिल्हा, तालुका पदाधिकारी व सदस्य मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यु.डायगव्हाणे यांनी संघटनेचे महत्व आणि कार्य यावर प्रकाश टाकला.या नंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेची नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन कार्यवाह अजय लोंढे यांनी संघटनेने वर्षभरात केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.कार्यक्रमाचे संचालन योगानंद फरांदे यांनी केले तर, प्रास्ताविक कार्यवाह अजय लोंढे सर, आभार प्रदर्शन कुमारी राजश्री कांबळे. या जिल्ह्यातील शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते…
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोली नविन कार्यकारी मंडळ……
अध्यक्ष रवींद्र नैताम,कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर,उपाध्यक्ष -मनोज निंबारते,संजय कुनघाडकर,यादव बांबले,माणिक पिल्लारे,कार्यवाह अजय लोंढे,संघटन सचिव कालिदास बन्सोड, चंद्रकांत नरुले, सहकार्यवाह रेवणाथ लांजेवार,कमलाकर रडके,अरुण राजगिरे,वेंकटरमण पोलोजी,कोषाध्यक्ष अजय वर्धलवार,प्रसिद्धी प्रमुख सूरज हेमके,महिला प्रतिनिधी कुमारी मिरा बिसेन,कुमारी वनिता जांगावार

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page