Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अँड यादवराव धोटे महाविद्यालयात राबवण्यात आली लसीकरण...
spot_img

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अँड यादवराव धोटे महाविद्यालयात राबवण्यात आली लसीकरण मोहीम

राजुरा प्रतिनिधी:- 3 जानेवारी 2024 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अँड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित अँड यादवराव धोटे महाविद्यालय तथा उपजिल्हा रुग्णालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोज गुरुवारला सकाळी ठीक 9.30 वाजता पासून महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ करण्याचे उद्देशाने Tetanus toxoid ( TT ) चे लसीकरण करण्यात आले

विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाचे महत्त्व सांगून संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्याकरिता ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली

या लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महाविद्यालयातील एकूण 206 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला

या लसीकरण मोहिमेत सूर्यकांता चव्हाण आरोग्य सेविका उपजिल्हा रुग्णालय राजुरा लता मडावी आरोग्य सेविका उपजिल्हा रुग्णालय राजुरा रविंद्र जीरापुरे आरोग्य सेवक उपजिल्हा रुग्णालय राजुरा तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे पर्यवेक्षिका मनीषा राखुंडे व आरोग्य तथा स्वच्छता विभाग प्रमुख गोविंद झाडे तथा अन्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page