Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरप्रामाणिकता ही सर्वात मोठी पदवी: प्रा.डॉ. सुभाष वरकड
spot_img

प्रामाणिकता ही सर्वात मोठी पदवी: प्रा.डॉ. सुभाष वरकड

नववर्षात ॲड. दीपक चटप यांची शिक्षण यात्रा राजुऱ्यात

राजुरा: – काळानुरूप शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करावी लागेल. शैक्षणिक प्रमाण वाढत असताना भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार आणि अविश्वासार्हता वाढताना दिसते. प्रामाणिकता ही सर्वात मोठी पदवाई आहे. दीपकने प्रामाणिकतेतून स्वकर्तृत्वाने दैदीप्यमान यश मिळवले हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. सुभाष वरकड यांनी केले. दीपकचे शैक्षणिक काम आम्ही शिक्षकांनी हाती घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप यांच्या पुढाकारात शिक्षण यात्रा राजुरा येथे पोहचली. यावेळी उपप्राचार्य खैराणी, केशवराव ठाकरे, पांडुरंग चन्ने, वैभव अडवे, प्रा. शंभरकर आदींची विशेष उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग तथा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान शिक्षण यात्रा सुरू आहे. चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यात ॲड. दीपक चटप हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय शिक्षण यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. दीपक चटप म्हणाले
की, शैक्षणीक संधींचे विकेंद्रीकरण व लोकशाहीकरण होणे गरजेचे वाटते. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात नव्या संधींकडे लक्ष ठेवून क्षमता बांधणी करावी. येणाऱ्या काळात निवासी शिबिर, कार्यशाळा आदी शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित संस्थांत पाठविण्यासाठी सुसज्ज करू असेही त्यांनी सांगितले. शिक्षण यात्रेमागची भूमिका अविनाश पोईनकर यांनी मांडली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page