Friday, February 23, 2024
HomeUncategorizedपाचगाव येथे स्वच्छता अभियान. - गुड्यावरील आदिवासींनी केला ग्राम स्वच्छतेचा निर्धार.
spot_img

पाचगाव येथे स्वच्छता अभियान. – गुड्यावरील आदिवासींनी केला ग्राम स्वच्छतेचा निर्धार.

राजुरा 2 जानेवारी:-

  "स्वच्छतेतून समृध्दी कडे" हा  महात्मा गांधी,संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संदेश गांव-गुडे-वस्त्यावर पोहचविण्यासाठी राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून ग्रा.प.पाचगाव मधील आदिवासी गुड्यावर स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांनी गाव स्वच्छतेचा निर्धार केला.
  प्रभाग क्रमांक ३चे सदस्य बापुराव मडावी व ग्रामविकास अधिकारी विजय घुगे यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत पाचगाव, अंबुजा फाऊंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैकाडीगुडा, घानागुडा यांनी संयुक्तपणे कोडापेगुडा, मडावीगुडा, कैकाडीगुडा व घानागुडा येथे स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली.
   कवी गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची "हाती धरून झाडू तू मार्ग झाडलासी. स्पर्शे तुझ्या महात्मा ये थोरवी श्रमाशी ! हाती धरून झाडू तू मार्ग झाडलासी" हे स्वच्छतेचा संदेश देणारे गीत गाऊन ग्रामस्थांमध्ये नवीन उमेद निर्माण केली.
  स्वच्छता अभियानात सदस्य बापुराव मडावी, ग्रामविकास अधिकारी विजय घुगे, अंबुजा फाऊंडेशन चे प्रकल्प संचालक तथा माजी उपसरपंच गोपाल जंबुलवार, सदस्य मनोज कुरवटकर, हिरामण कुमरे,पेसा समिती अध्यक्ष गंगु पाटिल कुमरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जंगु कोडापे, उपाध्यक्ष निर्मला मडावी, नारायण मोगिलवार, मुख्याध्यापक विनायक बोंडे, शिक्षक गजानन घिवे,गाव पाटील भिमराव कुमरे,लिंगु मडावी,बालु पाटील कोवे,देवराव मडावी,अनिल मडावी, हनुमंतू आत्राम,मलकु कोवे,मानकु कुमरे,इंदोराव कोटनाके, निखिल कुमरे, लिंबाराव कुमरे,दत्तू कुमरे,लक्ष्मण कुमरे, सिंगटराव सिडाम,रमेश तोडासे,विशाल कोटनाके,ग्रा.प.कर्मचारी रामा आळे,आशा सेविका वर्षा पाल,जंगु मडपती,बारीकराव कोवे, व्यंकटेश मोगिलवार जि.प.शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page