Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरविकसित संकल्प भारत यात्रेचा कोंडेखल येथे मोठ्या उत्साहात स्वागत
spot_img

विकसित संकल्प भारत यात्रेचा कोंडेखल येथे मोठ्या उत्साहात स्वागत

संकल्प यात्रेस जिल्हाधिकारी यांची उपस्थिती सावली प्रतिनिधी:- पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मौजा कोंडेखल येथे दि.30/12/2023 रोजी विकसित संकल्प यात्रेचे आगमन झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरला कोटांगले सरपंच कोंडेखल तर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी विविध योजनेची माहिती देत उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केलं, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परिक्षीत पाटील तहसीलदार सावली, त्याच प्रमाणे पंचायत समिती सावली चे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक , बबन बावनवाडे उपसरपंच कोंडेखल , जिल्हा कृषी अधिकारी ठाकरे ,तालुका वैदयकीय अधिकारी सावली, बाल विकास प्रकल्प अधिकारी सावली, गट शिक्षाधिकारी सावली, तालुक्यातील विविध अधिकारी,कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला वर्ग तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात केंद्र शानामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजणा बाबत उपसथितांना सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड, मोदी आवास योजनेचे मंजुरी आदेश, म.ग्रा. रो. ह.योजने अंतर्गत विहरीचे प्रशासकीय आदेश तसेच विविध प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला बचत गटांतर्फे विविध स्टॉल लावण्यात आले, आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर वासनिक गट विकास अधिकारी यांनी केले तर आभार परिक्षीत पाटील तहसीलदार साहेब सावली यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page