Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीश्रीमद् भागवत कथाश्रवणाचा लाभ घ्यावा-- ह भ पं शंकरजी बारसागडे महाराज
spot_img

श्रीमद् भागवत कथाश्रवणाचा लाभ घ्यावा– ह भ पं शंकरजी बारसागडे महाराज


चामोर्शी :- ब्रह्मलीन नानोजी खोटेले महाराजांच्या कृपाप्रसादाने श्री दत्त जयंती निमित्त सोन कुकरा परिवार आजनटोला यांच्या सौजन्याने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन मौजा आजनटोला (वडेगाव ) ता. कुरखेडा येथे करण्यात आलेले आहे . यासाठी सर्व भाविक भक्तांनी या भागवत कथेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन भागवतकार ह भ पं शंकरजी बारसागडे महाराज लाल डोंगरी , चामोर्शी यांनी केले आहे .
या भागवत कथेचे प्रारंभ मार्गशीष शुद्ध 11 शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 पासून ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत हे भागवत कथा पारायण / प्रवचन चालणार आहे . रामधून करिता दररोज विशेष भजन दिंडीचे सहकार्य लाभणार आहे . यामध्ये आत्मप्रवर्तक भजन मंडळ आजनटोला , हरी ओम विठ्ठल आत्मप्रवर्तक भजन मंडळ वडेगाव , जय माता दी भजन मंडळ पुलकल , जय सरस्वती माँ भजन मंडळ धमदीटोला , जय सियाराम भजन मंडळ मंदिरटोला या मंडळाच्या वतीने भजन दिंडीचे आयोजन तसेच रात्री आलेल्या संतांचे किर्तन प्रवचन आणि जागरण कार्यक्रम होणार आहे .विशेष म्हणजे भागवतकार ह भ पं शंकरजी बारसागडे महाराज यांचे भाविक – भक्तांना भागवतामृत ऐकण्याची संधी तसेच शासकीय विविध योजनांची माहिती प्राप्त होणार आहे . दि . 27 डिसेबरला गोपाल काला , प्रमुख पाहुणे सत्कार आणि महाप्रसाद वितरण . तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रीमद्भागवत कथेचा रसास्वाद घ्यावा अशी आग्रहाची विनंती आयोजक सुनकुकरा परिवाराचे ह भ पं . बंसारामजी , फुलवरबाई , प्रीतलालजी , जयंत्रीबाई , गुलाबजी , चंपाबाई , चरणदासजी , सविता हेमराज , सुरेखा सोनकुकरा आणि मनोज , तलमेश , राजेश , योगेश ,खुशबू , सेवन , कोमल , निखिल , पूजा , सानिया आदींनी उपस्थित राहण्यासाठी विनंती केलेली आहे .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page