Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीशासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान --आमदार डॉ. देवराव...
spot_img

शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान –आमदार डॉ. देवराव होळी यांचे आव्हान

पाविमुरांडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण भव्य महिला शिबीर व विकसीत भारत संकल्प यात्रा

दि. 23 डिसेंबर 2023 चामोर्शी:-

प्रशासनाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागळा पर्यंत पोहोचवल्यास सामान्य नागरिकांना त्यांचा लाभ होईल असे आव्हान आमदार डॉ.देवराव होळी यांनी कार्यक्रमाप्रसंगी केलेले आहे. पाविमुरांडा येथील महसूल विभागाच्या वतीने मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण ,विकसित विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत समाज कल्याण विभाग व दिअंथो राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महिला शिबिर व सास्कृतिक कार्यक्रम येवली येथे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत घोरुडे साहेब, हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर नायब तहसीलदार वैदय , सरपंच पोटावी तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .
आपल्या उदघाटणीय भाषणात गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिलांचे सशक्तिकरण,सबलीकरण, शासन स्तरावरून मिळणाऱ्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू असून समाजातील सर्व तळागाळातील महिला पर्यंत शासनाच्या योजना शासन स्तरावरुन पोहोचविण्यात याव्यात व त्याचा लाभ महिलांनी व नागरिकांनी घ्यावा.एकंदरीत प्रशासनातर्फे पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान पाविमुरांडा येथील महसूल विभागाच्या व ग्रामपंचायतींच्या वतीने वैयक्तिक स्वच्छालय ,घरकुल योजना , दिव्यांग महिला निधी ,स्वनिधी या
योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .तर आरोग्य शिबिर, महिला बचत गटांचे स्टाल व उत्पादन प्रदर्शन शासकीय योजनाची माहिती स्टाल, नवीन महिला बचत गटांची नोंदणी, सांस्कृतिक कार्यक्रम,विविध शासकीय योजनांचे स्टाॅल व लाभार्थ्यांना लाभ वितरण महिला रोजगार मेळावा प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी पाविमुरांडा येथे महसुल विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी झाली होती . शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page