Saturday, February 24, 2024
Homeगडचिरोलीथोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी
spot_img

थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी


धानोरा तालुका प्रतिनिधी:- दिनांक २२ डिसेंबर रोज शुक्रवारला जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे “थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन ” यांची जयंती
मानवाच्या विकासासाठी गणीताचे महत्व विद्यार्थांना समजावे आणि रामानुजन यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी , गणीताविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने “राष्ट्रीय गणित दिन”. म्हनुन साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक व्हि.एम. सूरजुसे तर प्रमुख मार्गदर्शक प्रशांत साळवे (गणित शिक्षक ) प्रमुख अतिथी डॉ.रश्मी डोके, पी बी तोटावार ,कु.रजनी मडावी, एस..एम.रत्नागिरी, विजय बुरमवार, ओम देशमुख ,सहारे किरण दरडे ,प्रीती भोयर मॅडम,नागापुरे होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सूरजूसे यांनी विद्यार्थ्याना गणिताचे जीवनातील महत्व विविध उदाहरणाद्वारे समजाऊन दिले.गणित शिक्षक साळवे यांनी श्रीनिवास रामानुजन यांचे जीवनावर विद्यार्थ्याना प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून माहिती दिली गणितीय विश्लेषण,संख्या सिद्धांत,अनंत मालिका विविध गणितीय संकल्पनांची माहिती दिली.गणित विषय हा मनोरंजनातून शिकविल्यास विद्यार्थ्यांची भीती दूर होईल. आयुष्यात गणीत विषयी भीती न बाळगता सकारात्मक राहण्याचे आवाहन केले.गणित शिक्षक कोल्हटकर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनात आलेले प्रसंग विषद केले. गणिती सूत्र कसे आठवण ठेवायचे याविषयी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने गणिती संबोध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा,आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन एस.एम.रत्नागिरी तर आभारप्रदर्शन मोहन देवकाते यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु चंदना , कु.गीतांजली सोनवले ,, कु. आर्यन मोहूर्ले,

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page