Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीनिशिगंधा इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनी
spot_img

निशिगंधा इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनी

निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी प्रदर्शनीचे आयोजन

चामोर्शी:- येथील निशिगंधा इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती तयार करण्यासाठी वर्ग सातवीचे विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान ,भौतिक संसाधने, प्रदूषण, अशा विविध विषयावर आधारित एकूण 17 मॉडल्स ची प्रदर्शनी भरवण्यात आली होती. या प्रदर्शनी मध्ये हिमांशी गवारे व श्रुती गडे यांच्या मॉडेल ला प्रथम क्रमांक; उज्वल मांडवगडे , बंकेश रॉय , चैतन्य बारसागडे, व अंदवेत रामगिरीवार यांच्या मॉडेलला द्वितीय क्रमांक तर श्रेया राऊत हिच्या मॉडेल ला तृतीय क्रमांक देण्यात आले. ह्या प्रदर्शनीचे आयोजन वर्गशिक्षक मोरेश्वर कुनघाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या प्राचार्या संचालिका वालदे तसेच शिक्षक सिंधू रामटेके ,हिराचंद उंदीरवाडे , मनीषा अवताडे ,सुमित दास ,मुक्ता तातावर ,वंदना भरणे ,धनिष्ठा उंदीरवाडे ,अंजुम सय्यद ,चेतना खरवडे ,प्रकाश गेडाम ,अर्चना साखरे, रीना हलदर ,फिलिप लिम्मा ,शाहिना खान ,लक्ष्मीकांता देशमुख, सपना शर्मा ,बिना मंडल ,शिवानी साना शिक्षकेतर कर्मचारी अनुसया यारावर, सविता कटलावार ,अनिता मेक रतिवार, कल्पना आकेवार ,अंतकला नैताम ,सावजी सहारे उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page