Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरग्रामसफाई व रक्तदान शिबीराने ब्रम्होत्सवाची सुरूवात
spot_img

ग्रामसफाई व रक्तदान शिबीराने ब्रम्होत्सवाची सुरूवात

राजुरा :- चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानास अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य अठराव्या ब्रम्होत्सव सोहळयाचे आयोजन २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज (दि. २१) ग्रामसभाई-जनजागृती दिंडी व रक्तदान शिबीराने ब्रम्होत्सवाची मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.

ब्रम्होत्सवाची सुरूवात आज सकाळी चुनाळा ग्रामवासी, श्री संप्रदाय सेवा समिती चुनाळाचे सदस्य, जिल्हा परिषद मराठी, तेलगू प्राथमिक शाळा व शिवाजी हायस्कूल चे सर्व शिक्षक व विद्यार्थी, महिला मंडळ सदस्या, तसेच महिला बचत गटाच्या महिला सदस्या यांच्या जनजागृती दिंडी व ग्रामसफाई ने झाली. सकाळीच गावाची साफसफाई करून गावात जनजागृती दिंडी काढण्यात आली. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील व परिसरातील बालाजी भक्तांनी रक्तदान शिबीरात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करीत राष्ट्रीय कार्यत सहभाग नोंदविला.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुदर्शन निमकर, चुनाळयाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, मनोहर निमकर, शंकर पेद्दूरवार, मनोज पावडे, गोरखनाथ शुंभ, प्रितम शहा सह देवस्थानचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

आजपासून ब्रम्होत्सवाची उत्साहात सुरूवात झाली असून या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमेटीद्वारा केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page