Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोली---अरे बापरे 106 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
spot_img

—अरे बापरे 106 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा


शासकीय कन्या आश्रमशाळा सोडे येथील घटना
दिवाकर भोयर धानोरा तालुका प्रतिनिधी:
सोडे येथिल शासकीय कन्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या १०६ मुलींना अन्न पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना आज दिनांक २०/१२/२०२३ ला दुपारी घडली त्यामुळे पालकांच्या मनात भिंती निर्माण झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळते.
धानोरा तालुक्यातील सोडे येते आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत शासकीय कन्या आश्रम आहे.त्यामुळे येथे मुलीच निवासी राहतात .शाळेत १ ते१२ वीपर्यंत वर्ग असुन त्यात एकूण३६९ विद्यार्थी शिक्षण घेतात . त्यापैकी आज ३५८ मुलि विद्यार्थीनीं पठावर उपस्थित होते.शाळा सकाळ पाळीत भरल्या नंतर नेहमीप्रमाणे दुपारी१२.०० मुलीनि जेवून घेतले.जेवणात आलू कोबी वरण-भात होते. सर्वांनी जेवण करून घेतले आणि ३.०० वाजताच्या दरम्यान मात्र काही विद्यार्थीनिमुलिंना अचानक पोटात दुखणे ,मळमळ होणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे ,डोके दुखणे अशा प्रकारच्या व्याधींचा त्रास सुरू झाला. मुलिंनाअसले त्रास सुरू झाल्याने त्यांनी शाळेतील प्रमुखाकडे कळविले.नंतर आश्रम शाळेतील अधीक्षक यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सावसागडे यांना फोन द्वारे कळविण्यात आले.लगेच रुग्णवाहिका चालक यांनी रुग्णवाहिकेत मुलिंना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. रुग्णालयात दाखल केलेल्या मुलि ६ ते १८ वयोगटातील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातच परत सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उर्वरित विद्यार्थ्यांना बाकीच्याच सारखा त्रास सुरू झाल्याने १५ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ६.००वाजता ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.तर ४७ मुलिंना गडचिरोली येथे हलविण्यात आल्याचे कळते.
सोडे येतील आश्रम शाळेतील मुलिंना जेवणातून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने येथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.३५८ पैकी १०६मुलिनांच विषबाधा झालिच कशी? तेहि जेवन झाल्या नंतर लगेच न जानवता उशिरा कसे काय? स्वयंपाक बनविलेले गंज वेगळे होते काय? यात कर्मचाऱ्यांचा अर्लगरजिपणा झाला नसेल कशावरून असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करताना दिसतात.याची सखोल चौकशी करन्याची मागणी पालकांनी केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page