Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीहत्तीना स्वताच्या नैसर्गिक जीवनशैली नुसार जीवन जगू द्या. प्रशांत दुबे हत्तीतज्ञ
spot_img

हत्तीना स्वताच्या नैसर्गिक जीवनशैली नुसार जीवन जगू द्या. प्रशांत दुबे हत्तीतज्ञ


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
आसाम येथुन आलेल्या रानटी हत्तीचा एक कळप सध्या धानोरा तालुक्यातिल आपल्या परिसरात असल्याने त्यांना कोणतीही ईजा न पोहचविता त्यांना त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलि नुसार जीवन जगू दएन्यआचए आव्हाहन त्यांनी केले ते धानोरा येथील किसान भवन येथे
दिनांक ०६/१२/२०२३ रोजी गडचिरोली वनविभागाअंतर्गत उत्तर धानोरा परिक्षेत्रातील मानव व हत्ती संघर्ष याबाबत किसान भवन येथे आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन हत्ती तज्ञ प्रशांत दुबे करताना यांनी केले.
यावेळी मंचावर श्री. मकरंद दातार (NGO) , कु. वैशल्ल्ली बारेकर सहा. वनसंरक्षक तेंदू (प्रभारी), श्री.विलास चेन्नूरी संवस पर्यवेक्षाधीन उपस्थित होते.तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व मुरूमगांव, वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम मुरूमगांव वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी द. धानोरा हे स्वतः व त्यांचे अधिनिस्त वनरक्षक व वनपाल हजर होते.
कार्यशाळा किसान भवन धानोरा येथे घेण्यात आले. पुढे बोलताना प्रशांत दुबे सांगितले कि, हत्ती व मानव संघर्ष टाळण्याकरीता काय उपाययोजना करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. हत्ती गावात येणार नाही याकरीता गावाचे सिमेवर वनाचे दिशेने स्ट्रिट लाईट लावावे. तसेच हत्ती येण्याच्या संभाव्य मार्गावर शेकोटी पेटवून ठेवल्यास हत्ती गावात येणार नाही.मिरची पावडरचा धूर दिल्यास हत्ती गावात शिरणार नाही असे सांगितले. तसेच गावात कुणाचे घरी , झोपडीत मोहाफुले साठविले असल्यास त्याचे वासाने हत्ती गावात शिरतात .याकरीता मोहफुले कुणीही घरी साठवून ठेवू नये .याकरीता गावात, परिसरातिल लोकात जनजागृती करणे आवश्यक आहे. मोहाचे दारूचा वास आल्यास देखील हत्ती गावात येतात करीता मोहाची दारू सुद्धा बाळगू नये असे उपाय सुचविले. हत्ती मार्गक्रमण करीत असतांना हत्तींना हाकलून लावणे, पेटती मशाल फेकून मारणे, त्यांचे मागे धावणे इत्यादी प्रकार टाळावे. असे केल्याने हत्ती चिडून गावात शिरतील व घरांना हानी पोहचवतील परीणामी मानवावर लक्ष करून जीवे सुद्धा मारू शकतात करीता त्यांना त्यांचे नैसर्गिक जीवनशैलीनुसार जगू द्यावे. हत्तींना त्रास दिल्यास मानवाचा पाठलाग करतात तेव्हा आपल्यासोबत असलेला एखादा कापड, भांडे, एखादी वस्तु फेकावे असे केल्याने पाठलाग करणरे हत्ती त्या वस्तूवर राग काढतात .यावेळात मानवाला दुरवर पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. शेतपिकाचे नुकसान करतांना हत्तींना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास हत्तीचा झुंड पसरून शेतीचे अधिक नुकसान करतात त्यामुळे त्यांना हाकलू नये. हत्तींना लहान पील्ले असल्यास अधिक आक्रमक होतात तेव्हा जवळ जाणे टाळावे इत्यादी मार्गदर्शन केले. स्पीकरद्वारे हत्तीच्या अस्तित्वाबाबत लोकामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे जनता जागरूक होऊन हत्ती य मानव संघर्ष टाळता येतो.

सदर कार्यशाळा मा.श्री. मिलीश दत्त शर्मा उपवनसंरक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळा यशस्वी करन्यासाठी श्री. वसंत वि.मेडेवार वपअ उ.धानोरा, श्री.नंदकुमार केळवतकर वपअ द, धानोरा, श्री. विजय कोडापे चपअ पु. मुरूमगांव, कु.कन्हाडे मंडम वपअ प.मुरूमगांव यांनी परिश्रम घेतले . सदर कार्यशाळेला पु.मुरूमगांव पश्चिम मुरूमगांव, उत्तर धानोरा, दक्षिण धानोरा परिक्षेत्रातिल सर्व वनरक्षक वनपाल असे एकुण ७५ कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेला उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page