Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीआमदार होळी यांच्या हस्ते रांगी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
spot_img

आमदार होळी यांच्या हस्ते रांगी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातिल रांगी येथे आधारभूत किमतीनुसार खरेदी केंद्राचा शुभारंभ मा. आमदार देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले .
रांगी परिसरातील शेतकऱ्यांची धानाची मळणी होवुन महिना उलटला पण धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली होती.तसेच गरजवंत बळीराजा खाजगी व्यावसायिकांना अतिशय कमी किंमतीत धान्य विकावे लागत होते.मात्र खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातिल शेतकर्याना सुविधा उपलब्ध झाल्याने सुटकेचा श्वास सोडला.
यावेळी सौ.लताताई पुंगाटे धानोरा तालुका अध्यक्ष भाजपा, शशिकांत भाऊ साळवे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली, सोनवणे साहेब उप प्रादेशिक व्यवस्थाप धानोरा देविदास दुगा सभापती, नारायण हेमके संचालक, देवरावजी मोगरकर, घनश्यामजी खवले, वामन गेडाम, लालाजी पदा ,सुरेश हलामी व्यवस्थापक कमलबाई बोरसरे, विमलबाई गडपायले,मा. शंभरकर साहेब मॅनेजर को-ऑपरेटिव्ह बँक रांगी, ठुमराज कुकडकार केंद्रप्रमुख, विठ्ठल चापडे, ऋषीजी कुणघाटकर, यांच्यासह पदाधिकारी ,रांगी परिसरातील शेतकरी,गावातील नागरिक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page