Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीडॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व---आमदार डॉक्टर देवराव...
spot_img

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व—आमदार डॉक्टर देवराव होळी

चामोर्शी येथील आंबेडकर वार्डातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन

चामोर्शी:- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६७ वर्ष झाली असून अनेक शतके स्मरणात राहतील अशा व्यक्तिमत्वाचे बाबासाहेब धनी होते . भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणारे बाबासाहेब हे सर्व समाजाला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज दिनांक 6 डिसेंबर रोजी चामोर्शी येथील आंबेडकर वार्डातील. महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाप्रसंगी केले.
बाबासाहेब आंबेडकर हे जगमान्य व्यक्तिमत्व संपूर्ण जगामध्ये आजही त्यांचे विचार कायम अस्तित्वात असुन त्यांच्या विचाराचा जगभर आदर व सन्मान केला जातो. शोषित वंचितांना लढण्याचे बळ देऊन सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे बाबासाहेब हे महान व्यक्तिमत्व असल्याचे आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page