Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरसंत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भव्य पालखी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन.
spot_img

संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भव्य पालखी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन.

राजुरा (ता. प्र) :– दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवार ला तेली समाज युवक मंडळ राजुरा, रामपूर तालुका राजुरा द्वारा तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंतीचे औचित्य साधून भव्य पालखी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठिक ११ वाजता जूने बसस्थानक ते संत श्री. संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह राजुरा – गडचांदूर रोड, संत श्री. जगनाडे महाराज चौक (सास्ती टी पाईंट) रामपूर, राजुरा अशी भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर जयंती सोहळा, आरती, मान्यवरांचे मार्गदर्शन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेली समाज बंधु भगीणींचे सत्कार, इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर विभागात सत्र २०२३ मधील गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचीत लोक प्रतिनिधींचे सत्कार आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आध्यात्मिक मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव बेले, प्रमुख अतिथी निवृत्त सुभेदार, राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त शंकरराव मेंगरे, विदर्भ तेली महासंघ सचिव ओमप्रकाश मांडवकर, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवा आघाडी म. प्रा. तै. महा. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष निलेश बेलखेडे, युवा आघाडी म. प्रा. तै. महा. चंद्रपूर जिल्हा कार्यध्यक्ष आशिष देवतळे, विदर्भ तेली समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव रागीट, सचिव किशोर पडोळे, तेली स. क. मं. वेकोली अध्यक्ष देवराव चन्ने, सचिव सुरेश बुटले, प्रमुख वक्ते नागभीड येथील संताजी एक योद्धा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, प्रसिद्ध साहित्यिक संजय येरणे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, मार्गदर्शक मंडळ सदस्य पांडुरंग चन्ने, शामराव खोब्रागडे, शंकरराव बानकर, मारोतराव येरणे, आनंदराव हिवरे, मधुकरराव बजाईत, वामनराव बावणे, श्रीमती जनाबाई बाबूराव रागीट, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ तेली समाज मंडळ तालुका राजुरा, महिला तेली समाज मंडळ तालुका राजुरा, तेली समाज कल्याण मंडळ विकोली तालुका राजुरा, यांचे विशेष सहकार्य राहणार असून यानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांना राजुरा तालुक्यातील समस्त तेली समाज बंधू-भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तेली समाज युवक मंडळ राजुरा, रामपूर तालुका राजुराच्या वतीने करण्यात येत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page