Sunday, February 25, 2024
HomeUncategorizedकोदेपार येथील डान्स हंगामावर नागभीड पोलिसांची धाड
spot_img

कोदेपार येथील डान्स हंगामावर नागभीड पोलिसांची धाड

(प्रशांत गेडाम)
नागभीड –
नागभीड तालुक्यातील कोदेपार येथे विनापरवानगी डान्स हंगामा कार्यक्रम सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कोदेपार येथे धाड टाकून सदर कार्यक्रम बंद पाडला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता कोदेपार येथे बंद शामियाना टाकून झाडीपट्टी स्टार लावणी डान्स ग्रुप नागपूर प्रस्तुत डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन करून, लोकांची गर्दी जमवून, लाऊड स्पीकर चा वापर करून कार्यक्रम केल्याचे मिळून आल्याने आयोजक आरोपी – चार जणाविरुद्ध पोलीस स्टेशन नागभीड येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास योगेश घारे पोलीस निरीक्षक नागभीड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page